घरमहाराष्ट्रब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी

ब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी

Subscribe

ब्राम्हण आरक्षणावरील महाचर्चेतील सूर

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर आता बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे, अशी मागणी होऊ लागली आहे. ब्राम्हण युवती व महिलांची सुरक्षितता तसेच तरुणांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली आहे.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्र्यंबक रोडवरील अभ्यंकर सभागृहात ‘ब्राह्मण समाजास आरक्षण हवे की नको’ या विषयावर रविवारी महाचर्चा घेण्यात आली. या महाचर्चेनंतर सहा ठराव मंजूर करण्यात आले. त्यांच्या पूर्ततेसाठी दबावगट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ब्राह्मण समाजाने प्रांत व शाखाभेद विसरून एकमेकांमध्ये रोटी-बेटीचा व्यवहार करणे आवश्यक असल्याचे सांगितले़.

- Advertisement -

राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरले आहे. जोपर्यंत समाजाच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकीत मतदान न करण्याची तसेच दबावगट तयार करण्याची सूचना त्यांनी मांडली. आरक्षणाच्या मागणीपूर्वीच निर्माण झालेल्या नोकर्‍यांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित करून उद्योगाकडे वळण्याचे आवाहन निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले. तर देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सरस्वतीला लक्ष्मीची जोड आवश्यक असून यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

गुजरातमधून ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा समोर आला असून ही काळाची गरज आहे. समाजाला आरक्षण आवश्यक असले तरी त्यापूर्वी समाजातील युवकांच्या प्रगतीसाठी सर्वप्रथम आर्थिक विकास महामंडळ तसेच महिला व युवतींची सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश गोखले होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह उदयकुमार मुंगी, नगरसेवक दीपाली कुलकर्णी व अ‍ॅड. श्यामला दीक्षित, अ‍ॅड. भानुदास शौचे, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, माधव भणगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी तर सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणारे ठराव
-देशातील विविध जाती-जमातींच्या आरक्षणास ब्राह्मण समाजाचा विरोध नाही.
-ब्राह्मण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची तातडीने स्थापना करावी.
-पुरोहित वर्ग, वेद पाठशाळा व आर्थिक दुर्बल घटकांच्या मानधनासाठी योजना आखून अंमलबजावणी करण्यात यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -