Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी गजाआड

ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी गजाआड

पोलिसांनी केले चोरट्यांकडून दोन चोरीचे ट्रॅक्टर हस्तगत

Related Story

- Advertisement -

कन्नड येथील पिशोर व करमाड पोलीस ठाणे हद्दीत ट्रॅक्टर चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. वडोदबाजार, अमरावती, नरला, खंडाळा, देवगाव रंगारी येथील सहा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

शेख समीर उर्फ दादा शेख रज्जाक (२८,रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री), अमोल भाऊसाहेब खामाट (२५, रा अमरावती, ता. फुलंब्री), ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञान्या विष्णू धाडे (२४, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री), गजानन शंकर तुपे (३६, रा. नरला, ता. फुलंब्री), समीर बशीर पठाण (३६, रा. खंडाळा, ता. वैजापूर) (६) कलीम बॅग सलीम बॅग (४८, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, २६ व २७ मे २०२१ रोजी काजी यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर (एम एच २०- एफपी२१६५) व लोखंडी ट्रॉली चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी ऐतेशाम नासेर काजी यांनी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १४ मे रोजी रफिक गफूर बागवान यांच्या शेतातून ट्रॅक्टर चोरट्याने लंपासकेले. याप्रकरणी बागवान यांनी करमाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

शेख समीर शेख रज्जाक याने ट्रक चोरला असून तो त्याची परस्पर विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्याने अमोल खामाट व ज्ञानेश्वर धाडेसमवेत चोरी केल्याचे सांगितले. तसेच १५ दिवसापूर्वी लाडसावंगी गावातून त्याचा गजानन तुपे सोबत ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरल्याचे सांगितले. दोन्ही ट्रॅक्टर ओळखीचे समीर पठाण, कलीम बॅग सलीम बॅग यांच्याकडे विक्रीसाठी दिले आहेत, अशी माहिती समीर शेखने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी ट्रॉलीसह दोन ट्रॅक्टर जप्त केले.

- Advertisement -