घरताज्या घडामोडीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, राजकीय चर्चांणा उधाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, राजकीय चर्चांणा उधाण

Subscribe

राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. भाजपकडून गुप्तपद्धतीने हालचाली सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रातले दौरे वाढत आहे. नवी मुंबई येथील खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पाडला. या सोहळ्याला अमित शाह यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कोकणात बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाचा वाद सुरू आहे. या वादावरून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया या राजकीय नेत्यांकडून येत आहेत. ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. हे सर्व वाद सुरू असतानाच दुसरीकडे भावी मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बॅनर्स राज्यातील काही भागांत त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले असून त्याची चर्चा होताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत असून नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमित शाहांचा हा एप्रिल महिन्यातील दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. मात्र, अमित शाह हे त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दोन दिवसांपूर्वी अमित शाह हे नागपूर दौऱ्यावर येणार होते. परंतु पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं त्यांनी तो दौरा रद्द केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या मुंबई दौऱ्यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे अमित शाहांचा हा दौरा किती महत्त्वाचा ठरेल. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : लोककलावंतांसाठी अजित पवारांचा पुढाकार, आर्थिक विकास महामंडळाची मागणी; CM शिंदेंना पाठवलं पत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -