घरताज्या घडामोडीनक्षलग्रस्त भागात विमान दुर्घटनाग्रस्त, दोन जणांचा मृत्यू

नक्षलग्रस्त भागात विमान दुर्घटनाग्रस्त, दोन जणांचा मृत्यू

Subscribe

रुखशंका हे वैमानिक असून, मोहित हे प्रशिक्षक आहेत. महाराष्ट्रातील बिरसी येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. तेथून प्रशिक्षणार्थी विमानाने दुपारी दोन वाजता उड्डाण केले होते. अडीच तासांनंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याचा पत्ता लागला.

महाराष्ट्रातून उड्डाण केलेले प्रशिक्षणार्थीचे विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात महिला वैमानिक आणि प्रशिक्षकांना आपला जीव गमवावा लागला. रुखशंका आणि मोहित यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. (Trainee Craft Fell In Balaghat Pilot And Instructor Died Both Burnt Alive)

मिळालेल्या माहितीनुसार, रुखशंका हे वैमानिक असून, मोहित हे प्रशिक्षक आहेत. महाराष्ट्रातील बिरसी येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. तेथून प्रशिक्षणार्थी विमानाने दुपारी दोन वाजता उड्डाण केले होते. अडीच तासांनंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याचा पत्ता लागला.

- Advertisement -

बालाघाटच्या नक्षलग्रस्त भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती जळताना दिसत आहे. किरणपूरजवळील भाक्कू टोला येथील जंगलात ही घटना घडली. हे जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे.

‘ट्रेनर आणि एक महिला ट्रेनी पायलट विमानात होते. विमानाच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह जळताना दिसत आहे’, असे या अपघातानंतर बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले.

- Advertisement -

दुसऱ्या वैमानिकाची माहिती मिळू शकली नाही. हे प्रशिक्षणार्थी विमान महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी विमान होते. तसेच, बालाघाट जिल्ह्याच्या सीमेवर ते कोसळले आहे.

अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या किरनापूरच्या कोस्मारा पंचायतीअंतर्गत भाक्कू टोला गावात ही घटना घडली.


हेही वाचा – पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाडांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -