घरताज्या घडामोडीपुणे सोलापूर महामार्गावर ट्रक आणि टँकरच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू ५ जण...

पुणे सोलापूर महामार्गावर ट्रक आणि टँकरच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू ५ जण जखमी

Subscribe

महामार्गावर झालेल्या अपघातात महामार्गावर ट्रक आडवा पडला होता त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती

पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर ट्रक आणि टँकरची जोरदार धडक झाली आणि या अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित टेंभुर्णी आणि इंदापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर झालेल्या अपघातात महामार्गावर ट्रक आडवा पडला होता त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर दीड तासांनंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर पुण्याकडे जाणारा एक ट्रक सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रँकर यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि टँकरची धडक झाल्यावर दोन्हीचा चेंदामेंदा झाला. ट्रक महामार्गावर आडवा पडला आणि संपूर्ण महामार्ग बंद झाला. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर अपघात स्थळी ट्रकमधील ३ जण आणि टँकरमधील एक जण असे चार जण गंभीर जागीच ठार झाले होते तर इतर चार गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

भीमा नदी पुलावर सध्या रोडचे काम सुरू असल्याने तिथल्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. ट्रक आणि टँकर चालकांना अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे तिथल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – एसटी संपाबाबत शासनाचा बी प्लॅन तयार

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -