घरताज्या घडामोडीTwitter लवकरच आणणार नवं फिचर, ट्रोलर्सपासून मिळणार सुटका

Twitter लवकरच आणणार नवं फिचर, ट्रोलर्सपासून मिळणार सुटका

Subscribe

वापरकर्ते अश्लील भाषेत ट्विट करतील त्यांचे अकाऊंट आपोआप ७ दिवसांसाठी ब्लॉक होणार

माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच वापरकर्त्यांसाठी एक नवं फिचर लॉन्च करणार आहे. या फिचरमुळे ट्विटर वापरकर्त्यांना ट्रोलर्सना समोरे जाण्यापासून सुटका मिळणार आहे. वापरकर्त्यांसाठी ही सुखद बातमी आहे खास करुन त्या वापरकर्त्यांना ज्यांना ट्रोलर्सच्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. या फिचरमध्ये वापकर्त्याला ट्विट केल्यावर त्यावर कोणी प्रतिक्रिया म्हणजेच रिप्लाय देऊ शकते याची निवड स्वतःलाच करता येणार आहे. परंतु हे फिचर कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. रिव्हर्स इंजीनियरिंग एक्सपर्ट जेन मंचुन वोंग यांनी या आगामी ट्विटरच्या फिचरबाबत माहिती दिली आहे.

रिव्हर्स इंजीनियरिंग एक्सपर्ट जेन मंचुन वोंग यांनी नव्या फिचरबाबत माहिती दिली आहे. वोंग यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ट्विटर सध्या नव्या फिचरवर काम करत आहे. या फिचरचे नाव ‘change who can reply’ असे आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्ता ठरवू शकतो की आपल्या ट्विट वर कोणी रिप्लाय करावा आणि कोणी नाही. तसेच एखाद्या वापरकर्त्याचे ट्विटवर रिप्लाय नको असल्यास त्याला तुम्ही बंदही करु शकता. सध्या या फिचरवर प्रक्रिया आणि चाचणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

या फिचरवरुन काही वापरकर्त्यांनी प्रश्न केला आहे की, हे फिचर सुरु केल्यावर पुर्वीचे रिप्लाय जाणार की नवे रिप्लाय बंद होणार? यावर ट्विटरच्या या फिचरचे वोंग यांनी काही स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले आहेत. तसेच वोंग यांनी सुपर फॉलोबाबत माहिती दिली आहे. ट्विटरच्या या फिचरच्या मदतीनं वापरकर्त्यांकडून स्पेशल कंटेंट साठी पैसे लागतील, या फिचरच्या वापरासाठी वापरकर्त्याचे वय १८ वर्षांवर असले पाहिजे तसेच त्याचे फॉलोअर्स १० हजार असायला हवेत. तसेच ३० दिवसांमध्ये कमीत कमी २५ ट्विट केले असावेत. ट्विटर सेफ्टी मोडवरही काम करत आहे. यामध्ये जे वापरकर्ते अश्लील भाषेत ट्विट करतील त्यांचे अकाऊंट आपोआप ७ दिवसांसाठी ब्लॉक होणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -