घरमहाराष्ट्रनाशिकदैव बलवत्तर म्हणून बचावल्या..!

दैव बलवत्तर म्हणून बचावल्या..!

Subscribe

राज्य महामार्गावर ट्रकने धडक देऊनही देवळ्यातील दोघी तरुणींचा वाचला जीव

बाबा पवार : देवळा

विंचूर-प्रकाशा मार्गावरील गुंजाळनगर येथे भरधाव येणार्‍या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणी यात गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणूनच या भीषण अपघातात या दोघांचाही जीव वाचला.

- Advertisement -

देवळा पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी दि १८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर गुंजाळनगर येथे श्रुंगी रामदास मगर (१८) व श्रद्धा सूर्यकांत पाटील (२२) ह्या दोघी अ‍ॅक्टिव्हा (एमएच ४१ एपी १७७८)ने घराकडे जात असताना नाशिककडून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने (एमएच १५ जेव्ही ५५८०) धडक दिल्याने त्या रस्यावर फेकल्या गेल्या, त्यांना डोक्याला व हाता-पायांना जबर मार लागला. अपघात घडता क्षणी नागरिकांनी धाव घेऊन या तरुणींना देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डोक्याला जास्त मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी दोघींना नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -