घरताज्या घडामोडीसोशल मीडियावर युजीसीचे व्हायरल झालेलं पत्र खोटं, उदय सामंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

सोशल मीडियावर युजीसीचे व्हायरल झालेलं पत्र खोटं, उदय सामंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Subscribe

सोशल मीडियावर यूजीसीचे पत्र व्हायरल होत आहे ते खोट असून त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय परीक्षेसाठी उपलब्ध आहेत. परंतु सोशल मीडियावर जे यूजीसीचे पत्र व्हायरल होत असून गैरसमज पसरवला जात असल्याचे उदय सामंत म्हणाले. या पत्राबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकशी करण्यात आली आहे. कुलगूरुंनीही हे पत्र खोटं असल्याचे सांगितले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११९ वा पदवीप्रदान समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधता येतो. यावेळी सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेशमध्ये देण्यात यावा त्यांच्या परीक्षा घेताना ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय ठेवावे असे अनेकवेळा सांगितले आहे. परंतु एक गैरसमज पसरवला जात आहे की, युजीसीचे एक पत्र आलं आहे. या पत्रामध्ये ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच परीक्षा घेण्यात याव्यात अशा प्रकारचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कुलगूरुंकडे चौकशी केली. कुलगूरूंनी आणि रजिस्ट्रारनी हे पत्र खोटं असल्याचे सांगितले आहे. म्हणून अशा खोट्या पत्रावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.

- Advertisement -

यंत्रणा अजून सक्षम करण्याची आवश्यकता

विद्यार्थ्यांची स्पष्ट भूमिका आहे की, यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे. म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्या या मागेसुद्धा कारण आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. असा पेपर जर फुटला असेल आणि परीक्षा झाली असती तर योग्य झाले नसते म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निर्णय घेतला हि यंत्रणा अजून सक्षम करण्याची आवश्यकता आहे. ती कशी करायची हे प्रत्येक विभागाचे मंत्री पाहत असतात अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.


हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यांची निदर्शनं, पोलिसांनी काही जणांना घेतलं ताब्यात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -