घरताज्या घडामोडी'कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय'

‘कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय’

Subscribe

कोरोना हा वन ऑफ द व्हायरस इज आहे. त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही, असा सल्ला भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उद्यनराजे भोसले यांनी साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले.

‘सध्या देशावर आलेल्या कोरोनाच्या परिस्थितीला न घाबरता सामोरे जा. तसेच कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जात आहे. स्वीडनमध्ये ज्याप्रकारे हर्ड इम्युनिटी पद्धीतीचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे भारतानेही वापर करावा. तसेच, कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारण करु नये’, असा सल्ला भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उद्यनराजे भोसले यांनी साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार; एकूण ३ ट्रिलियन्स व्हायरस आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असले. त्यामुळे कोरोना हा वन ऑफ द व्हायरस इज आहे. त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही. पण, प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि या व्हायरसला घाबरुन न जाता वस्तुस्थितीला सामोरे गेले पाहिजे, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. यावर उदयनराजे म्हणाले की, कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारु बोलले नाही. त्यामुळे मी माझे मत परखडपणे मांडत असतो.


हेही वाचा – जलनीती करोनापासून संरक्षण करते- डॉ. धनंजय केळकर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -