घरताज्या घडामोडीशिवसेनेत गद्दारी किंवा दुर्लक्ष होतेय का ? निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता...

शिवसेनेत गद्दारी किंवा दुर्लक्ष होतेय का ? निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त

Subscribe

कॉंग्रेस, राष्ट्रवादी यासारख्या आपल्या मित्रपक्षातील मोठे नेते झोकून सगळ्या छोट्यातल्या छोट्या निवडणुकांमध्ये उतरतात. मग ती ग्रामपंचायत निवडणूक असो, जिल्हा बॅंकेची असो वा विधान परिषदेची असो वा खासदारकीची. आपल्याला इतर पक्षांप्रमाणेच झोकून काम करण्याची गरज आहे. एखादा अपवाद सोडला तर अशा निवडणुकांमध्ये आपले दुर्लक्ष होते. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे विश्लेषण करायचे झाले तर त्यामध्ये मीदेखील गुन्हेगार आहे. अशा निवडणुकांमध्ये आपणदेखील सर्वस्व पणाला लावून या निवडणुकांना सामोरे जाण्याची जिद्द यापुढच्या काळात ठेवली पाहिजे. जे पक्षातील गद्दार आहेत, त्यांनी शिवसेनेला रामराम करावा. मुठभर शिवसैनिक राहिले तरीही त्यांच्याकडे स्वाभिमानाची तलवार देण्याची खात्री मला नक्कीच आहे, असे उद्गार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मोठे नेते रिंगणात उतरून त्यांच्या उमेदवारांना सपोर्ट करतात. आपल्याकडे ही गोष्ट होत नाही. त्यामध्ये एखाद दुसरा अपवाद वगळला तर असे प्रयत्न होत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये काही कारणांमुळे या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. त्याला मी पण गुन्हेगार आहे, मी पण लक्ष दिले नाही. पण यापुढे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण हरलो. आईच दुध विकणारी औलाद आपल्यात नाही, जे असतील त्यांनी बिनधास्त शिवसैना सोडावी. मुठभर राहिले तरीही चालेल पण निष्ठावान शिवसैनिक हवे आहेत. त्यांना स्वाभिमानाचीच तलवार मी हाती देईन असेही ते म्हणाले.

- Advertisement -

इतर प्रतिस्पर्ध्यांनी गावागावात संस्थात्मक कामे केली आहेत. सहकार, नव्या संस्था उभ्या करण्यासाठी अर्ज येत आहेत. आपण सत्ताधारी असताना आणि मी मुख्यमंत्री असताना आपण काय करतो आहोत ? कारखाने उभारण्यासारखी इतर पक्षासारखी आपण संस्थात्मक काम करत नाही. अनेकदा अशा संस्थात्मक कामातच सभासद बांधिल असतात. अशी कामे करत सत्तेचा दुरोगामी उपयोग करून घेता यायला हवा. नाही तर एकहाती सत्ता नुसती बोलण्यापुरती राहील. हातात बळ आणल तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जी संधी मिळाली आहे, त्या संधीचे सोने केले पाहिजे. यापुढच्या काळाच शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी उतराव असेही ते म्हणाले. त्याचवेळी सगळ्यांनी घेरल्यावर बंगालच्या वाघिणीने कसा फटका दिला याचे उदाहरण त्यांनी दिले. बंगालच्या वाघिणीसारखे लढा असेही ते म्हणाले.

तर दिल्लीत आज आपला पंतप्रधान असता

बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले नवहिंदू सगळे भंपक नव्या पिढीला हे माहिती व्हावे म्हणून पुनरूच्चार. आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो. आज आपला पंतप्रधानही असता. मोदींच्या, शहांच्या अर्ज भरण्यास गेलो. मनापासून तुमचा प्रचार केला. आज एनडीए राहिली नाही जुने ते सर्व गेले. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही. बलवान हिंदुत्व हवय.
आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. आणीबाणी सदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसैनिकांनी समोर यायला हवे.

- Advertisement -

सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या 

यापुढे प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या. आशाताईंच्या पुण्यात शिवसेनेने घेतलेल्या कार्यक्रमाची आठवण. निवडणुकीत निष्काळजीपणा नको. फाजील आत्मविश्वास नको. साहेबांच्या जन्मदिनी सांगेल तुम्ही महाराजांना मानता अस समजा आज महाराज रायगडावर आहे ते आपल्याला पाठीवर थाप देतील. आजही साहेब आपल्यातच आहे, आपण अस काय केले तर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील असा रोज विचार करा. शिवसैनिक समर्थ बलवान आहे.आपण अहोरात्र मेहनत करायची भगव्या परंपरा तोच भगवा साहेबांनी आपल्याला दिला असा मौल्यवान आहे. नत्राच्या हातीच शोभतो. दिवसागणिक भगव्याचे तेज वाढवत चला.

हरलो तरीही खचून जायचे नाही

इतर राज्यात सुध्दा शिवसेना निवडणुका लढवते. हरलो तरी पराजयाने खचून जायचे नाही विजयाचा उन्माद नको. कधी तरी जिंकणारच. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांक वर असलो तरी आम्ही जागा किती लढवल्या अगदी युती मध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या. आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हवे. इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -