घरमहाराष्ट्र'आमचं ठरलंय; त्यात कोणी तोंड घालू नये'

‘आमचं ठरलंय; त्यात कोणी तोंड घालू नये’

Subscribe

'आमचं ठरलं; त्यात कोणी तोंड घालू नये', अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

सत्ता आल्यास अडीचअडीच वर्षे मुख्यमंत्री पद असे ठरले असून, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायची रणनीती एकीकडे सुरू आहे. तर भाजपाकडून शिवसेनेला अप्रत्यक्ष डिवाचण्यात आले असून, भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची भावना असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. ‘अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. त्यात इतर कोणी तोंड घालू नये‘, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्यांचे प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का? उज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरिबांना मिळाला? गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का? शेतकरी कर्जमुक्त झाला का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. शिवसेना सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारमधे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. त्यामुळे आता त्यांची दुःख दूर करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची भावना – गिरीश महाजन

हेही वाचा – कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी; उद्धव ठाकरे यांचा लासूरमध्ये पुनरुच्चार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -