घरमहाराष्ट्रभाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची भावना - गिरीश महाजन

भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची भावना – गिरीश महाजन

Subscribe

भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची भावना असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात विधानसभा निवडणुका व्हायच्या अगोदरच कुरबुरी चालू झाल्याचे दिसून येत आहे.

सत्ता आल्यास अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद असे ठरले असून, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायची रणनीती एकीकडे सुरू असताना आता भाजपाकडून शिवसेनेला अप्रत्यक्ष डिवाचण्यात आले असून, भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची भावना असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात विधानसभा निवडणुका व्हायच्या अगोदरच कुरबुरी चालू झाल्यात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील भाजपा कार्यालायत पदाधिकारी, आमदार, मंत्री यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनाभाजपा युती झाली असली तरी मुख्यमंत्री कुणाचा यावरून जोरदार चर्चा सुरू असून, आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपाच मोठा भाऊ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युतीमध्ये मोठा भाऊ कोण अशी चर्चा सुरू असताना गिरीश महाजन यांनी लोकसभेचा निकाला पाहता भाजपा राज्यात मोठा भाऊ असल्याचे सांगत शिवसेनेला अप्रत्यक्ष डिवचले. एवढच नाही तर शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचे सांगत जिथे शिवसेना कमजोर होती त्या ठिकाणी आम्ही मदत केल्याचे देखील महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव म्हणाले सगळं समसमान पाहिजे

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनला उद्धव यांनी ‘सगळं कसं समसमान पाहिजे’ असे सांगितले होते. तसेच आमची युती झाल्यानंतर पुन्हा भांडण झालं तर? अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. पण आम्ही ज्या ज्या मुद्द्यांवर भांडण होऊ शकतं, वाद होऊ शकतो, तेच मुद्दे आम्ही आधी स्पष्ट करून टाकले आहेत. त्यामुळे आम्ही युतीमध्ये वाद किंवा भांडण होऊच शकत नाही, अजिबात होणार नाही’, असं उद्धव ठाकरे वर्धापन दिना दिवशी म्हणाले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल हा मुद्दा गौण आहे. त्याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे वर्धापन दिनाला सांगितले होते.


हेही वाचा – शिवसेना आता कॉर्पोरेट बनली!

- Advertisement -

हेही वाचा – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -