घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सूकता

Uddhav Thackeray : राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सूकता

Subscribe

उद्धव ठाकरे यांची सभा ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने या ठिकाणचे राजकीय वातावरण तापले आहे. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने उद्धव ठाकरेंची ही जनसंवाद यात्रा महत्त्वाची ठरणार आहे.

कणकवली : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला मागील चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे. रायगडच्या दौऱ्यानंतर आता ठाकरेंची तोफ ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये धडाडणार आहे. उद्धव ठाकरे हे आज (ता. 04 फेब्रुवारी) आणि उद्या सोमवारी (ता. 05 फेब्रुवारी) या दौऱ्यावर असणार आहेत. परंतु, आज त्यांची सभा ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने या ठिकाणचे राजकीय वातावरण तापले आहे. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने उद्धव ठाकरेंची ही जनसंवाद यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. (Uddhav Thackeray meeting at Narayan Rane Kankavli)

हेही वाचा… Aaditya Thackeray : शिंदे सरकारच्या सर्व पॉलिसी सूटबुटातील लोकांसाठी; रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरे कडाडले

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल झाले असून ते सर्वात प्रथम गांधी चौक-सावंतवाडी आणि कुडाळ-जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरणाचे लोकार्पण करतील. यानंतर सायंकाळी पाच वाजता ते आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी सहाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेतून शिवसैनिकांशी संवाद साधतील. महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंची ही सभा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून हाकेच्या अंकतरावर होणार आहे. त्यामुळे आज या परिसरात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या कणकवलीतील सभेमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या सभेला भाजपाने आणि प्रामुख्याने नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी तीव्र विरोध केला आहे. परंतु, कोणाच्याही विरोधाला घाबरणार नाही, असे ठाकरे गटातील नेत्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर, कुडाळमध्येही उद्धव ठाकरे यांची मोठी सभा होणार असल्याने आमदार वैभव नाईक यांच्याकडून याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही पाहणी करून वाहतूक व्यवस्था व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील जिजामाता चौक येथे सभेसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. तर आज सायंकाळी होणाऱ्या कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -