घरमहाराष्ट्रसुप्रीम कोर्टातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा - उद्धव ठाकरे

सुप्रीम कोर्टातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा – उद्धव ठाकरे

Subscribe

सुप्रीम कोर्टातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते राज्यातील साहित्यिक, लेखक, कवींच्या संदिच्छा मातोश्री भेटीवेळी बोलत होते.

मुंबई – मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्यातील साहित्यिक, लेखक, कवींनी संदिच्छा भेट दिली. या भेटीत गेल्या काही दिवसांत सुरु असलेल्या राज्यातील घडामोरींमुळे साहित्यिक, लेखक कवी, विचारवंत अस्वस्थ असल्याचा सूर उमटला. या सगळ्यातही उद्धव ठाकरे यांनी जो लढा दिला तो गौरवास्पद आहे. त्यांच्या सोबत राज्यातील साहित्यिक असल्याची भावना अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केली.

आम्ही आपल्या सोबत –

- Advertisement -

अनेत साहित्यिक, लेखक-कवी व महाराष्ट्र अभ्यासू गटाने उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या गढूळ राजकीय परिस्थितीवर सर्व साहित्यिक आणि अभ्यासू नागरिकांनी दु:ख व्यक्त करत साहित्यिक अस्वस्थ आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी केलेले काम व आताचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याबाबत आदर वाढविणारे आहेत. आम्ही आपल्या सोबत आहोत हे सांगायलाच ही सदिच्छा भेट असल्याचे कवयत्री नीरजा यांनी सांगितले. या भेटीसाठी नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला होता.

 

- Advertisement -

उद्धव ठाकरे काय म्हणाले –

या भेटीत उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचे आभार मानले. संघर्षाच्या काळात आपण सर्व आमच्यासोबत आलात, त्याबद्दल आपले आभार मानतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्याबाबत सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत, देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सोबत असलेले लोक आपले गुलाम राहिले पाहिजे अशी भावना सध्या देशात दिसत आहे. प्रादेशिक पक्ष किंबहुना प्रादेशिक अस्मिता नष्ट करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. मुळात आपण राजकारणी नाही, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते. पंरतु परिस्थितीनुसार व जिद्दीने मुख्यमंत्री झालो होतो त्यात देखील चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -