घरमहाराष्ट्र'...तर तुम्ही जाऊ शकता'; उद्धव ठाकरे यांचा अजित ‘दादां’ना अप्रत्यक्ष टोला?

‘…तर तुम्ही जाऊ शकता’; उद्धव ठाकरे यांचा अजित ‘दादां’ना अप्रत्यक्ष टोला?

Subscribe

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सध्या अंतर्गत कुरबुरी सुरू असून, सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन लोटस करून तर बघा असा इशारा भाजपाला दिला असून, यावेळी त्यांनी भाजपाच्या ऑपरेशन लोटसला अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. पालखीचे भोई होणे एवढेच तुम्हाला समाधान हवे आहे आणि पालखीचे ओझे वाहायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, असा अप्रत्यक्ष टोलाच त्यांनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरे यांचा निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर नव्हता ना?, अशी चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यावेळी ऑपरेशन लोटसच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरू असून, महाराष्ट्रातदेखील ऑपरेशन लोटस केले तर काय होईल, अशी चर्चा सुरु असल्याचे संजय मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांना म्हणाले. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी करून बघा, असे सांगत मी भाकित थोडेच करू शकतो. तसेच असा कोणताही विरोधी पक्षनेता दाखवा जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेला आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षात असे काय मिळत नाही ज्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या पक्षात जात आहात? वापरा आणि फेकून द्या ही निती सर्वांनी वापरल्याची अनेक उदाहरणे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच दुसऱ्या पक्षाने आपला वापर करुन फेकून द्यायचे की, आपण आपल्या पक्षात ठामपणे काम करायअसे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

‘राज्यात १६ कोटींची गुंतवणूक मी घरबसल्याच केली’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -