स्मशानात दहनासाठी लाकडाऐवजी वापरु शकतो मोक्षकाष्ठ!

नागपूरच्या 'ईकोफ्रेंडली लिव्हिंग' या पर्यावरणप्रेमी संस्थेने ईको मोक्षकाष्ठ ही नवी संकल्पना उदयास आणली. या संकल्पनेचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे.

Ulhasnagar corporater Meena Sonde gives option of eco moshtikashti for wood of human combution
स्मशानात दहनासाठी लाकडाऐवजी वापरु शकतो मोक्षकाष्ठ!

मृत्यूनंतर मानवाच्या देहावर अंत्यसंस्कार केले जाते. या अंत्यसंस्कारमध्ये मानवाच्या शरीराला दहन करण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. वाढत जाणाऱ्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून ग्लोबल वॉरमिंग सारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. एकीकडे वृक्षरोपणाच्या मोहिम राबवल्या जातात तर दुसरीकडे वृक्षतोड रोखणंही अपरिहार्य ठरतंय. अशा वेळी नागपूरच्या ‘ईकोफ्रेंडली लिव्हिंग’ या पर्यावरणप्रेमी संस्थेने ईको मोक्षकाष्ठ ही नवी संकल्पना उदयास आणली. या संकल्पनेचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे. याच संकल्पनेचा पायंडा उल्हासनगर महानगरपालिकेनेही घ्यावा असे मत नगरसेविका मीना सोंडे यांनी महापालिकेच्या महासभेत मांडले आहे.

काय म्हणाल्या मीना सोंडे?

ईको मोक्षकाष्ठामुळे समाज आणि प्रशासनाला वातावरणाचे समतोल राखता येईल, असे मत मीना सोंडे यांनी महासभेत मांडले आहे. त्यांनी सांगितले की, ‘उल्हासनगर शहरातील चार कँपात असणाऱ्या हिंदू स्मशान भूमीत अंतिम संस्कारासाठी एका व्यक्तीस सरासरी ५ मन लाकडे लागतात. पाच मन लाकडांचे वजन २०० किलोच्या घरात जाते. त्या अन्वये वर्षभरात साधारण ४ हजार मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेतल्यास २० हजार मन लाकूडे लागतात. या लाकडासाठी मोठया प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते.’ त्यांनी महापालिकेच्या महासभेत प्रोजेक्टरवर संपूर्ण माहिती लोकप्रतिनीधींना दिली. मात्र, लोकप्रतिधींनी यावर साधी चर्चाही केली नाही. या मोक्षकाष्टबद्दल माहिती देणारा एका व्हिडीओ सोंडे यांनी दाखवला. महासभेमध्ये हा व्हिडीओ पाहण्यात नगरसदस्यांनी साधी रुची न दाखवल्याने मीना सोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे .

काय आहे मोक्षकाष्ठ?

मोक्षकाष्ठ हे सोयाबीनचा उरलेला कचरा, कापसाच्या बोंडाचा कचरा, चारा, व शेती उत्पन्नाच्या कचर्याच्या मिश्रणातुन बनवले जाते. हे विटा आणि ठोकळ्यांच्या आकाराचे असतात. लाकडात ३० टक्के असणारी आद्रता मोक्षकाष्ठात केवळ ५ टक्के असल्याने त्यात लाकडापेक्षा ज्वलनशीलता अधिक आहे. त्यामुळे धूर, कार्बन डायऑक्साईड प्रमाणही अत्यल्प आहे. एक शवदहनाकरीता जिथे ३०० किलो लाकडांची आवश्यकता असते तिथे २५० किलो मोक्षकाष्ठांत गरज पूर्ण होते.


हेही वाचा – अन् आमदार चक्क स्मशानात झोपले…!