Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुण्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारी बंद, १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे...

पुण्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारी बंद, १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे राहणार सुरु

पुण्यात २ हजार ५७९ कोरोनाबाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

पुणे महानगरपालिका हद्दीत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण उद्या मंगळवारी (४ मे २०२१) रोज लसीच्या पुरवठ्याअभावी बंद राहणार आहे. तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालय आणि येरवडा यथील राजीव गांधी रुग्णालय या दोन केंद्रांमध्ये सुरु असेल. या ठिकाणी केवळ नोंदणी असलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. पुण्यात आज पुन्हा कोरोना लसीचे डोस उपलब्ध झाले नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. परंतु १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण ‘कमला नेहरू’ व ‘राजीव गांधी’मध्ये सुरु राहील. या नागरिकांना कोविन अॅपवर नोंदणी वेळी नमूद करण्यात आलेल्या वेळेत बोलावले जाणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी न केल्यास आणि थेट कोरोना लसीकरण केंद्रात आल्यावर लसीकरण करण्यात येणार नसल्याचे माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

पुण्यात २ हजार ५७९ कोरोनाबाधितांची नोंद

पुणे शहरात गेल्या २४ तासात नवे २ हजार ५७९ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ३० हजार २१० इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ०४६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ८२ हजार ५१८ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १२ हजार २७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण कोरोना चाचणी संख्या आता २१ लाख ७५ हजार ३५० इतकी झाली आहे. कोरोनावरील उपचार घेणाऱ्या ४० हजार ७०१ रुग्णांपैकी १,४११ रुग्ण गंभीर तर ६,७२१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ९९१ इतकी झाली आहे.

- Advertisement -