घरमहाराष्ट्रनाशिकआजपासून 'व्हॅलेंटाईन्स वीक' ला सुरुवात

आजपासून ‘व्हॅलेंटाईन्स वीक’ ला सुरुवात

Subscribe

गुलाब खरेदीसाठी विवाहित पुरुषांचाही पुढाकार

नाशिक : फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणाईला ओढ लागते ती म्हणजे ’व्हॅलेंटाईन्स वीक’ची. फेब्रुवारी महिना प्रेमी युगुलांसाठी खास मानला जातो. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान हा ’व्हॅलेंटाईन्स वीक’ साजरा केला जाणार आहे. या आठवड्यातला पहिला दिवस अर्थात ’रोज डे’ आज जगभरात साजरा होणार आहे.

’व्हॅलेंटाईन्स वीक’ हा फक्त प्रेमी युगुलांसाठी असतो असा बहुतांश लोकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील, आपले हितचिंतक यांच्यासाठीदेखील हा आठवडा साजरा करायचा असतो. त्या व्यक्तींप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे ’डे’ज् महत्त्वाचे निमित्त असते. ’रोज डे’च्या पार्श्वभूमीवर गुलाब खरेदीसाठी फुलविक्रेत्यांकडे सोमवारपासूनच तरुणाईची गर्दी दिसून आली. एरवी १० रुपयांना मिळणार्‍या गुलाबाच्या फुलाची किंमत सोमवारी ३० ते ४० रुपयांवर पोहोचली होती.

- Advertisement -

गुलाबाच्या रंगांनुसार बदलतात अर्थ

आजच्या दिवशी गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले जाते. लाल रंगाचे गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या रंगांनुसार त्यामागील अर्थही बदलतात. लाल रंग प्रेमाचे, पिवळा रंग मैत्री, नारंगी रंग उत्साह, गुलाबी आभार, प्रशंसा व प्रसन्नता, पांढरा रंग पवित्रता व निरागसता, जांभळा रंग पहिल्या नजरेतल्या प्रेमाचे, तर निळा गुलाब हा आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो अशा व्यक्तीला दिले जाते.

असे साजरे होतील डेज्

  • मंगळवारी (दि.७) रोज डे
  • बुधवारी (दि.८) प्रपोज डे
  • गुरुवारी (दि.९) चॉकलेट डे
  • शुक्रवारी (दि.१०) टेडी डे
  • शनिवारी (दि.११) प्रॉमिस डे
  • रविवारी (दि.१२) हग डे
  • सोमवारी (दि.१३) किस डे
  • मंगळवारी (दि.१४) व्हॅलेंटाईन्स डे

युवकांनी रविवारपासूनच गुलाबाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. गुलाबाच्या किंमती यंदा ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, तरुणाईच्या उत्साहावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. केवळ अविवाहित तरुणच नव्हे तर विवाहीत पुरुषदेखील आपल्या पत्नीसाठी गुलाबाचे फुल खरेदी करत आहेत.      – राजकुमार यादव, फुलविक्रेता

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -