परीक्षेच्या काळात काही हितशत्रूंनी संभ्रम निर्माण करण्याच प्रयत्न केला, पण… – वर्षा गायकवाड

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारवीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. या निकालानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन!, असे ट्विट केले आहे. या सोबत त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

निकाल 3.56% वाढला –

या व्हिडीओत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यास करावा आणि यश संपाद करावे, असे आवाहन केले आहे. यासोबत त्यांनी परीक्षेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 मंडळांमधून एकूण 1356604 विद्यार्थी (94.22%) उत्तीर्ण झाले, त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी पुढे विशेषतःयंदाचा निकाल हा फेब्रुवारी-मार्च 2020च्या तुलनेत 3.56% वाढला आहे. कोरोनामुळे असामान्य परिस्थितीत अनेक आव्हानाला सामोरे जात या परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर आणि यशस्वी लावल्याबद्दल मंडळाचे आणि अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

हितशत्रूंनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला –

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही हितशत्रूंनी केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या, शाळांच्या आणि मंडळाच्या निर्धारामुळे परिक्षा यशस्वी पार पडल्या. त्याबद्दल सर्वांचे आभार त्यांनी मानले. सोबत त्यांनी सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या