घरताज्या घडामोडीVasant More : पुण्यात वॉशिंग मशीन नको म्हणून मविआच्या नेत्यांची घेतोय भेट...

Vasant More : पुण्यात वॉशिंग मशीन नको म्हणून मविआच्या नेत्यांची घेतोय भेट – वसंत मोरे

Subscribe

पुण्यात वॉशिंग मशीन नको हेत सगळ्यांचं मत आहे. त्याच मताची मी पण आहे की, पुण्यात वॉशिंग मशीन नसली पाहिजे. त्यामुळे सगळे जोविचार इतर करत आहेत, त्या विचारासाठीच मी इथे थांबलो आहे, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी सत्ताधार महायुतीवर निशाणा साधला.

मुंबई : पुण्यात वॉशिंग मशीन नको हेत सगळ्यांचं मत आहे. त्याच मताची मी पण आहे की, पुण्यात वॉशिंग मशीन नसली पाहिजे. त्यामुळे सगळे जोविचार इतर करत आहेत, त्या विचारासाठीच मी इथे थांबलो आहे, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी सत्ताधार महायुतीवर निशाणा साधला. (vasant more meet shivsena thackeray group leader sanjay raut at saamana)

नुकताच मनसेला सोडचिठ्ठी देत पक्षातून बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छूक आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. काल मी शरद पवार यांची भेट घेतील. त्याआधी मोहन जोशी यांनीही माझी भेट घेतली. आज संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. पुण्यातली माझी जी भूमिका आहे, ती मी आज संजय राऊतांसमोर मांडली. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे मांडतो आहे. मी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना भेटलो आहे. मला जी निवडणूक लढवायची आहे, ती पुणेकरांच्या हितासाठी लढवायची आहे. त्यासाठीच मी सगळ्यांची भेट घेत आहे. या भेटीनंतर योग्य तो मार्ग ते काढतील”, असे वसंत मोरे म्हणाले.

- Advertisement -

त्यानंतर वसंत मोरे यांना मनसे पक्ष सोडल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर  “मी अजूनही सर्वांची केवळ भेटच घेतोय. माझ्या भेटी मागच्या दाराने होत नाहीत. मी जिकडे जातोय, तिकडे थेट भेटयोय. अंधराता आणि पडद्याआड माझ्या भेटी नाही. माझं भाग्य आहे की, मी ज्या पक्षात होतो त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. चर्चाही सकारात्मक होत आहे”, असे उत्तर वसंत मोरे यांनी दिले.

पुढे वसंत मोरे म्हणाले की, “पुण्यात वॉशिंग मशीन नको हेत सगळ्यांचं मत आहे. त्याच मताची मी पण आहे की, पुण्यात वॉशिंग मशीन नसली पाहिजे. त्यामुळे सगळे जोविचार इतर करत आहेत, त्या विचारासाठीच मी इथे थांबलो आहे. पुण्यातील लोकसभेचे जागा ही काँग्रेसकडे असून, मी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. मोहन जोशी यांची भेट घेतली असून रवींद्र धंगेकर यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच, पुण्यात गेल्यानंतर मी रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलणार आहे”.

- Advertisement -

याचसाठी केला होता हट्टाहास – वसंत मोरे

“मी कालही सांगितलं तसं, याचसाठी केला होता हट्टाहास. म्हणजे मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला. त्या विषयापासून मी लांब गेलेलो नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावर बोलू इच्छित नाही. पुण्यात 100 नगरसेवकांच्या माध्यमातून हुकुमशाही माजवली जात आहे. त्या हुकूमशाहीच्या विरोधात मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे”, असेही वसंत मोरे यांनी म्हटलं.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -