घरमहाराष्ट्रचौकीदारांची चारित्र्य तपासणी करा; 'मै भी चौकीदार' अभियानाची काँग्रेसकडून खिल्ली

चौकीदारांची चारित्र्य तपासणी करा; ‘मै भी चौकीदार’ अभियानाची काँग्रेसकडून खिल्ली

Subscribe

अनेक चोर, गुन्हेगार हे स्वतःला चौकीदार म्हणवू लागल्याने देशात अभूतपूर्व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पहारेकऱ्यांकडेही लोक संशयाने पाहू लागल्यामुळे प्रामणिक पहारेकऱ्यांची मनस्थिती ही भांबावल्यासारखी झाली आहे. जनतेने कोणालाही पहारेकऱ्याची नोकरी देण्याआधी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

हे वाचा – मोनालिसाचं हास्य!

- Advertisement -

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, देशात चौकीदार म्हणून काम करणाऱ्यांपेक्षा स्वतःच्या नावा अगोदर चौकीदार लिहिणाखऱ्यांपासून प्रचंड धोका आहे. बहुतांश चोर मंडळी जनतेचा विश्वास संपादन करण्याकरिता अशा कार्यपद्धतीचा वापर करत असल्याने त्यांना नोकरी दिल्यास चोरी अथवा गुन्हा घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, घर, दुकाने यांच्या सुरक्षेसाठी चौकीदार नेमताना काळजी घ्यावी, असे सावंत म्हणाले.

देशातील पोलीस प्रशासनही अशा पद्धतीने कोणालाही नोकरीला ठेवताना त्याची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करत असते. आतातर शिक्षकांपासून इतर अनेकांना नोकरी देताना पोलीस तपासणीची अट घातलेली आहे. देशातील प्रामाणिक चौकीदार पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्याकरिता निश्चितच आनंदाने तयार होतील. स्वतःच्या नावाअगोदर चौकीदार लावणारे भामटे मात्र या तपासणीपासून पळ काढतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -