घरमनोरंजनत्या बाईला आठवण करुन द्या, गायक विशाल दादलानीचा कंगनावर संताप

त्या बाईला आठवण करुन द्या, गायक विशाल दादलानीचा कंगनावर संताप

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. अशातच कंगनाने एका मुलाखतीत, भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’ हे नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वातवरण ठवळून निघाले आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे तिच्यावर मोठ्याप्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनेही कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. विशाल दादलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने कंगनावर अप्रत्यक्षरित्यारित्या टीका केली आहे. विशालची ही पोस्ट सध्या सोशल माीडियावर तुफान व्हायरल होतेय.

विशाल दादलानी या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये त्याने शहीद भगतसिंह यांचा फोटो असलेला एक टी-शर्ट परिधान केला आहे. यावर ‘झिंदाबाद’ असे लिहिले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘स्वांतत्र्य ही भीक आहे, असे म्हणणाऱ्या त्या बाईला आठवण करुन द्या. माझ्या टी-शर्टवर शहीद सरदार भगतसिंह आहेत. जे नास्तिक, कवी तत्त्वज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, भारताचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या २३ व्या वर्षी प्राणांची आहुती दिली. त्यावेळी ओठांवर स्मितहास्य ठेवत, गाणे म्हणत ते फासावर चढले. तिला त्यांची आठवण करुन द्या.’ अशा शब्दात विशाल दादलानीने कंगनाविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान विशालने पुढे म्हटले की, “सुखदेव, राजगुरु, अशफाकउल्लाह यांसारख्या हजारो जणांनी इंग्रजांसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला. भीक मागण्यास नकार दिला, अशा सर्व लोकांची तिला विनम्रपणे आठवण करुन द्या, जेणेकरुन ती त्यांना पुन्हा कधीही विसरण्याची हिंमत करु शकणार नाही,”.  दरम्यान कंगनाच्या वक्तव्याविरोधात आता बॉलिवूड कलाकारांनही निशाणा साधला आहे. तर अनेकांनी तिची पाठराखण केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -