घरताज्या घडामोडीराणांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विनायक राऊतांचा इशारा

राणांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विनायक राऊतांचा इशारा

Subscribe

काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वांद्रे निवासस्थानी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत. रवी राणा यांच्या आव्हानानंतर मातोश्री बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मध्यरात्रीपासून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, अशातच राणांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी राणांना दिला आहे.

गनिमी कावा करत राणा दाम्पत्य मुंबई दाखल?

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही सकाळच्या विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. याची माहिती पोलिसांना देखील आहे. जी काही कारवाई करायची आहे. ती कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. शिवसैनिक मात्र महाराष्ट्र द्रोही जे लोकं काम करतायत, त्यांना मात्र धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा विनायक राऊतांनी दिलाय.

- Advertisement -

तमाशा करण्याचा प्रयत्न केलात तर…

बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. अशा भडगुंजा लोकांना जागा दाखवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यांना हनुमान चालिसा वाचायची असल्यास त्यांनी त्यांच्या घरामध्ये वाचावी. येथे येऊन जर तमाशा करण्याचा प्रयत्न केलात तर तुमचं नाटक करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेचं हिंदुत्व हे २४ कॅरेटच्या सोन्यासारखं

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि डिवचण्यासाठी महाविकास आघाडी अस्थिर करण्यासाठी हे काम सुरू आहे. हिंदुत्वावरून शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे २४ कॅरेटच्या सोन्यासारखं आहे. चोरवाट्याने येणाऱ्या पळपुट्यांना त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हे शिवसैनिकांमध्ये आहे. सरकार जे काही करायचं आहे ते करेल पण अशा बदमाश लोकांना धडा शिकवण्यासाठी संपूर्ण शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे. असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसैनिक शिवसेना स्टाईलने थांबवणार

मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणांचं बुकींग करण्यात आलं आहे. तसेच या गेस्ट होऊसच्या बाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तसेच राणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. बुकींग करून जर राणा हे गेस्ट हाऊसमध्ये आले नसतील तर ते आम्हाला घाबरत असतील. परंतु त्यांना शिवसैनिक शिवसेना स्टाईलने थांबवणार असा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी परवानगी नसतानाही मनसैनिकांनी छापल्या निमंत्रण पत्रिका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -