घरमहाराष्ट्रशहरात संचारबंदीच्या आदेशाचे उल्लघंन

शहरात संचारबंदीच्या आदेशाचे उल्लघंन

Subscribe

आठ दिवसांत २६६ पेक्षा जास्त गुन्हे , शनिवारी 102 जणांना अटक

मुंबईसह राज्यात जमावबंदी आणि संचारबंदीदरम्यान शासनासह मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शनिवारी मुंबई पोलिसांनी अन्य 55 गुन्ह्यांची नोंद करुन या गुन्ह्यांत 102 जणांना अटक केली आहे. त्यापैकी 95 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली. दहाजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले तर सातजणांना नोटीसद्वारे सक्त ताकिद सोडून देण्यात आले आहे.

20 मार्च ते 28 मार्चपर्यंत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 266 जणांविरुद्ध 188 कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यात करोना संदर्भातील तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. इतर गुन्ह्यांमध्ये हॉटेल आस्थापनाचे अठरा गुन्हे, पानटपरीचे नऊ गुन्हे, इतर दुकानांसदर्भात त्रेचाळीस गुन्हे, हॉकर्स-फेरीवालेसंदर्भात बारा गुन्हे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी एकशे बावीस गुन्हे, अवैध वाहतूकीचे एकोणसाठ गुन्हे दाखल झाले होते.

- Advertisement -

शनिवारी दिवसभरात अन्य 55 गुन्ह्यांची नोंद झाली असून सर्वाधिक 23 गुन्हे पूर्व मुंबईत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंदर्भात एक गुन्ह्यांचा समावेश आहे. हॉटेल-आस्थापनाचे एक गुन्हा, पानटपरीचे दोन, इतर दुकानांसदर्भात दोन गुन्हे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी बावीस, अवैध वाहतूकीच्या सत्तावीस गुन्हे तर इतर हॉकर्स आणि फेरीवालेसंदर्भात एकही गुन्हा दाखल झाला नाही.

दुसरीकडे गेल्या आठ दिवसांत मुंबई पोलिसांनी 188 कलमांतर्गत आतापर्यंत 467 जणांना अटक केली आहे. त्यात 37 जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले तर 55 जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. 412 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शनिवारी 28 मार्चला शहरात 102 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील 95 जणांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. दहाजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले तर सातजणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -