घरCORONA UPDATEWardha lockdown : वर्ध्यात पुढील ५ दिवस लॉकडाऊन कायम, अत्यावश्यक दुकाने वगळता...

Wardha lockdown : वर्ध्यात पुढील ५ दिवस लॉकडाऊन कायम, अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद

Subscribe

यापूर्वी वर्ध्यात ८ ते १३ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू होता.

राज्यात सध्या कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. राज्यात दररोज हजारो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या काहीशी कमी होत असली तरी मृतांचा आकडा वाढत आहे. यातच राज्यात लॉकडाऊनची जाहीर करण्यात आला परंतु लॉकडाऊन असतानाही वर्धा जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यात पुढील पाच दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याआधी लॉकडाऊनची मुदत १३ मेपर्यंत होती, मात्र आता वर्ध्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढववण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील पाच दिवस लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या नव्या नियमांतर्गत १८ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वर्ध्यात कडक निर्बंध लागू असतील. यापूर्वी वर्ध्यात ८ ते १३ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू होता. त्याची मुदत उद्या संपणार आहे, मात्र ही मुदत संपली असली तरी वर्ध्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध अचानक शिथिल झाल्यास रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे वर्धा जिल्हाप्रशासनाने पुढील पाच दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना भाजीपाला घरपोच मिळत होता. त्यासाठी शेतकऱ्यांकडून भाजापाला खरेदी करत तो थेट ग्राहकांपर्यंत घरपोच पोहचवण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले होते. परंतु नियम मोडणाऱ्यांविरोधात प्रशासन कडक कारवाई करणार आहे. वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असून प्रशासनाकडून त्याची चोखपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असणार असून विनाकारण घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. बेकरी, मिठाई इत्यादी दुकानेसुद्धा या काळात बंद असतील.


वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना जीएसटीत सवलत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -