घरमहाराष्ट्रज्या पक्षात सुषमा अंधारे, त्या पक्षाला मतदान नाही, वारकऱ्यांचा पवित्रा; नेमकं कारण...

ज्या पक्षात सुषमा अंधारे, त्या पक्षाला मतदान नाही, वारकऱ्यांचा पवित्रा; नेमकं कारण काय?

Subscribe

ठाकरे गटात दाखल होण्यापूर्वी हिंदू देवीदेवतांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे आता फायबरब्रँड नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. वारकऱ्यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकांत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार आणि काही खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली, या फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. या परिस्थिती सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. विरोधकांवर थेट टीकास्त्र डागणाऱ्या सुषमा अंधारे अत्यंत कमी काळात शिवसेनेतील ठाकरे गटाच्या एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखू जाऊ लागल्या, मात्र सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटातील प्रवेशापूर्वी केलेल्या विविध वादग्रस्त विधानांमुळे नवा वाद उफाळून आला आहे. याविरोधात आता विश्व वारकरी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

- Advertisement -

विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगासागर किनाऱ्यावर शपथ घेत सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, आजपासून मी शपथ घेतो की, ज्या पक्षात सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मी मतदान करणार नाही. गणेश महाराज शेटे यांचा शपथ घेतानाचा एक सध्या व्हायरल होत आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील अनेक वारकरी अशी शपथ घेतली,असही शेटे म्हणाले. त्यामुळे सुषमा अंधारेंच्या वक्तव्यांमुळे ठाकरे गटाची गोची झाली आहे.

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात हिंदू देवीदेवतांविषयी केलेल्या विधानामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. याच्या निषेधार्थ आळंदीमध्ये वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून अंत्ययात्रा काढली. आळंदीतील युवा किर्तनकार महेश मडके पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंधारेंनी संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा, सल्लाही वारकऱ्यांनी दिला आहे.

- Advertisement -

इतकचं नाही तर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांनी हिंदू देवीदेवतांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामुळे आता वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांकडून अंधारेंना कडाडून विरोध केला जात आहे.


‘अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी’, अजितदादांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -