घरताज्या घडामोडीबसमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेचा चालकाने 'असा' वाचवला जीव; वाचा सविस्तर

बसमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेचा चालकाने ‘असा’ वाचवला जीव; वाचा सविस्तर

Subscribe

एका बस चालकाने बसमध्ये आलेल्या हृदयविकाराचा झटका आलेल्या महिला प्रवाशाचा जीव वाचवल्याची माहिती समोर येत आहे. गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये ही घटना घडली. 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली.

एका बस चालकाने बसमध्ये आलेल्या हृदयविकाराचा झटका आलेल्या महिला प्रवाशाचा जीव वाचवल्याची माहिती समोर येत आहे. गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये ही घटना घडली. 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली असून, महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच बसच्या चालकाने बस थेट रुग्णालयात नेली. बस चालकाच्या या निर्णयामुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला आहे. (heart attack came in the ahamdabad bus driver gave life to the women passenger)

मिळालेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी गुजरातच्या गांधीनगरहून अहमदाबादच्या दिशेने ही बस जात होती. ही सरकारी बस असल्याचे समजते. या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी या बसमधील एका महिला प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला.

- Advertisement -

महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच बसमधील इतर प्रवाशांनी तिच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरूवात केली. मात्र महिला बसमध्ये असल्याने अडथळे निर्माण होत होते. त्यावेळी या बसच्या चालकाने रुग्णवाहिकेची वाट न पाहता प्रवाशांनी भरलेली बसच थेट जवळच्या रुग्णालयात नेली. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता, तिचा जीव वाचला.

याआधी, मुलीच्या हळदीला नाचत असतान हृदयविकाराचा झटका आल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली होती. उत्तराखंडच्या हल्दवानी येथील मीज हॉलमध्ये लग्न आयोजीत करण्यात आले होते. या घटनेने लग्न घरात दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

- Advertisement -

हृदयविकाराची कारणे काय?

बहुतेक हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमनी रोगामुळे होतो. हृदयाच्या (कोरोनरी) धमन्यांपैकी एक किंवा अधिक कोरोनरी धमनी रोगामध्ये अवरोधित केले जातात आणि हे सामान्यत: कोलेस्टेरॉल-युक्त साठ्यांमुळे होते ज्याला प्लेक्स म्हणतात.
प्लेक्समुळे धमनी अरुंद होऊ शकते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा मर्यादित होतो.
जेव्हा प्लेक तुटतो तेव्हा ते हृदयात रक्ताची गुठळी तयार करू शकते.
तथापि, हृदयातील कोरोनरी धमनीच्या संपूर्ण किंवा आंशिक अवरोधामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे जेव्हा इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG किंवा EKG) काही बदल (एसटी एलिव्हेशन) प्रकट करतो ज्यांना त्वरित आक्रमक उपचारांची आवश्यकता असते.


हेही वाचा – ‘अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी’, अजितदादांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -