घरदेश-विदेशनिसर्ग चक्रीवादळाचे मुंबईच्या दिशेने कूच

निसर्ग चक्रीवादळाचे मुंबईच्या दिशेने कूच

Subscribe

गृहमंत्री अमित शहांकडून आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांची बैठक

अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने कूच करत असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकार्‍यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. हे चक्रीवादळ येत्या ३ जून रोजी मुंबई, महाराष्ट्रासह गुजरातच्या समुद्रकिनार्‍यावर धडकणार असल्याचे सांगितले जाते. या वादळामुळे हानी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आतापासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे.

अरबी समुद्रात वादळाची स्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने महाराष्ट्रात एकूण ९ तुकड्या तैनात केल्या आहेत, ज्यापैकी मुंबईत ३, पालघरमध्ये २, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली.

- Advertisement -

मुंबईत पाऊस
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र २४ तासांमध्ये अधिक तीव्र स्वरूपाचे होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील २४ तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. या चक्रीवादळाचे बांग्लादेशने सुचविल्यानुसार निसर्ग असे नामकरण करण्यात येईल. निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळून जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीजवळील भागामध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. तसेच, वार्‍यांचा जोरही अधिक असेल.

मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता
सोमवारी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २ आणि ३ जून रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ आणि ४ जून रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, असा अंदाज आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईसह कोकण, नाशकात मान्सूनपूर्व पाऊस

राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सोमवारी पहाटे मुंबई, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातार्‍यात पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे मुंबई, कोकण आणि राज्यातील विविध भागांत मान्सून पूर्व पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने २, ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. तर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.

कुठे, किती पाऊस?
चक्रीवादळामुळे पालघरसाठी ३ आणि ४ जून रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड येथे या दोन दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवार आणि मंगळवार म्हणजे १ आणि २ जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार येथे सोमवार आणि मंगळवारी गडगडाट आणि विजांचा अनुभव येऊ शकतो. तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. नाशिक, अहमनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये सोमवार ते बुधवार या काळात गडगडाट, जोरदार वारे तसेच विजांचा अंदाज आहे.

मुंबईत मंगळवारपासून पाऊस
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वादळ नाशिकमध्येही धडकणार

तीन आणि चार जूनला अतिवृष्टीचा इशारा

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्ह्यावर धडकणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात तीन व चार जून रोजी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान पुर्वानुमान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिक जिल्ह्यात खबरदारीचे उपाय करण्याचे आदेश तहसीलदार, मुख्याधिकारी, कृषी अधिकारी यांनी दिले आहेत.

यावर्षी मान्सून बरोबर १ जूनलाच केरळात धडकला असतानाच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन निसर्ग हे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून त्यामुळे नाशिक जिल्ह्यात ३ व चार जून रोजी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचा हा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळी वारा, विजा कोसळणे व अतिवृष्टी यामुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. सध्या कोविड-१९चे संकट असून त्यात अतिवृष्टी व वादळी वार्‍यामुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन कोविड रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवणे, त्यांच्या निवार्‍याचे निर्जंतुकीकरण करणे, रुग्णालयाचा वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, पुरेसे मनुष्यबळ व औषध पुरवठा ठेवणे, स्थानिक पथके तैनात करताना त्यांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट यांचा पुरवठा करण

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे आदी उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. शेतकर्‍यांनी अतिवृष्टी व जोरदार वारे लक्षात घेऊन उघड्यावरील सर्व शेतमाल सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने सर्व नागरिकांना या वादळाबाबत जनजागृती करून सावधगिरी बाळण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारही सतर्क
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन कोकण किनारपट्टीवर आपत्ती निवारण दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहे. स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमार बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत. वादळाचा धोका असलेल्या भागातील जिल्हाधिकारी यांनी चक्रीवादळ पुर्वतयारी व उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तालुका प्रशासनालाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -