भातसा धरणातून बुधवारी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान भातसा धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

bhatsa dam

जून महिन्यात पावसाएन दडी मारली होती. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह राज्यभरातच जोरदार हजेरी लावली. पावसाने केलेल्या या दमदार बॅटिंग मुळे काही ठिकाणी पुअर परिस्थिती सुद्धा निर्माण झाली. अशातच काही ठिकाणी अनेक शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे सुद्धा तुडुंब झाली आहेत. अशातच भातसा धारण परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे या धरणातही मुबलक पाणी साठा आहे. दरम्यान भातसा धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा – तो मॅटिनी शो आता बंद झालाय, राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, एकनाथ शिंदेंचा…

भातसा धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य पाण्याचा वेढा(पाणी पातळी) वाढला आहे. त्यामुळे बुधवारी २० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे ६२१५.४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भातसा नदीकिनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Water Dam

हे ही वाचा – शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची…

भातसा धरणात मंगळवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत १३८.१० मीटर एवढी पाणी पातळी होती. धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात वाढत्या पावसामुळे आणखी संभाव्य वेढा(पाणी पातळी ) वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता धरणाचे १ ते ५ क्रमांकाची वक्रद्वारे उघडण्यात येणार आहेत. यातून धरणातील ६२१५.४४ क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे भातसा नगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे. त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व इतर गावांमध्ये प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना केली आहे. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हे ही वाचा – ‘जायकवाडी’तून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा