घरमहाराष्ट्रWeather Forecast : पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम! हवामान विभागाचा...

Weather Forecast : पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम! हवामान विभागाचा अलर्ट

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली तर अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांत ऊन-सावलीचा खेळ रंगल्याचे दिसून येतेय. अशातच पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर कोकणातही पावसाचा जोर कायम असणार आहे. दरम्यान पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाच्या सरी कायम बसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आता २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी

आजपासून पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असणार असून अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असून तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

२ आणि ३ सप्टेंबरला महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
४ सप्टेंबरला महाराष्ट्रातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, नांदेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

 

- Advertisement -

याशिवाय ५ सप्टेंबरला कोकणास, मध्य महाराष्ट्र,नांदेड, सोलापूर, सांगली, गडचिरोली जिल्ह्यात वरुणराजा बसरणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -