घरमहाराष्ट्रWeather Update: उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा; राज्यात 'या' भागांत पावसाची शक्यता

Weather Update: उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा; राज्यात ‘या’ भागांत पावसाची शक्यता

Subscribe

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. या पावसामुळे काहीशा प्रमाणात का होईना परंतु उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार आहे. (Weather Update Some respite from scorching heat Chance of rain in These parts of the state)

पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशा, पूर्व झारखंड, पूर्व विदर्भ, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, पूर्व झारखंड, पश्चिम बंगाल, पश्चिम आणि उत्तर ओडिशा येथे गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

- Advertisement -

26 ते 29 मार्चदरम्यान पावसाची शक्यता

आज 26 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि सिक्किममध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासंह शक्यता आहे. 26 मार्च ते 29 मार्चदरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे.

राज्यात या भागांत पावसाची शक्यता

देशासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासांत राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय लिकले येथे पुढील 24 तासांत काही ठिकाणी गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: LokSabha Election : ‘सामना’तून उद्धव गटाची पहिली यादी होणार जाहीर; कोण आहेत संभाव्य उमेदवार, पाहा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -