घरमहाराष्ट्रLokSabha Election: ‘सामना’तून उद्धव गटाची पहिली यादी होणार जाहीर; कोण आहेत संभाव्य...

LokSabha Election: ‘सामना’तून उद्धव गटाची पहिली यादी होणार जाहीर; कोण आहेत संभाव्य उमेदवार, पाहा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता सगळेच पक्ष आपापले उमेदवार निश्चित करत असून त्यांच्या याद्या देखील प्रसिद्ध होत आहेत. आतापर्यंत भाजपा, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी तर काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात देखील प्रामुख्याने या दोन पक्षांनीच आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. आता मंगळवारी उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असणार असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे.

हेही वाचा – Pakistan : पाकच्या पीएनएस सिद्दीकी नौसेना तळावर हल्ला; BLAच्या माजिद ब्रिगेडने स्वीकारली जबाबदारी

- Advertisement -

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय सोमवारी झालेल्या बैठकीत उमेदवारांची नावे आणि जागावाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागावाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी याबाबत ठाकरे आणि पवारांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी? यासोबतच राज्यात लोकसभेसाठी संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचं नियोजनसुद्धा या बैठकीत करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता…; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

संभाव्य उमेदवार

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ : विद्यमान खासदार अरविंद सावंत
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ : अमोल किर्तीकर
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ : संजय दीना पाटील
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : अनिल देसाई
रायगड लोकसभा मतदारसंघ : अनंत गीते
रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : विनायक राऊत
ठाणे लोकसभा मतदारसंघ : राजन विचारे
धाराशिव लोकसभा मतदारसंघ : ओमराजे निंबाळकर
परभणी लोकसभा मतदारसंघ : संजय जाधव
सांगली लोकसभा मतदारसंघ : चंद्रहार पाटील
मावळ लोकसभा मतदारसंघ : संजय वाघोरे
शिर्डी लोकसभा मतदारसंघ : भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ : नरेंद्र खेडेकर
हिंगोली लोकसभा मतदारसंघ : नागेश पाटील आष्टेकर
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ : चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : संजय देशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -