घरक्राइमDrugs Factory : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, सांगलीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

Drugs Factory : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, सांगलीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

Subscribe

सांगलीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून पर्दाफाश केला. या कारखान्यातून 100 किलो एमडी ड्रग्ज जप्त केला.

सांगली : सांगलीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून पर्दाफाश केला. या कारखान्यातून 100 किलो एमडी ड्रग्ज जप्त केला. पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरू असून, कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ येथील असल्याचे समजते. (drugs factory at sangli busted by mumbai police)

मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबई पोलीसांच्या पथकाने छापा मारला. त्यावेळी 100 किलोहून अधिक वजनाचे एमडी ड्रग्ज येथे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. याबाबत अधिक चौकशी केली असता या ड्रग्ज कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ येथील असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. सध्या पोलीस त्या मालकाची चौकशी करत असल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचचे निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने जिह्यातील ड्रग्ज निर्मिती कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. तसेच, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कुपवाड येथून 300 कोटी रुपये किमतीचे 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आयूब मकानदार याला अटक करण्यात आली होती. तसेच, 2015 नंतर सांगलीचे एमडी ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले होते.

एकीकडे सांगलीत ड्रग्जवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली असली तरी, गतवर्षी अशाच प्रकारचा ड्रग्जचा कारखाना मालेगाव येथे सापडला होती. ड्रग्ज माफिया ललित पाटील या कारखान्यात ड्रग्जची निर्मिती करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करत ललित पाटीलला अटक केली. तसेच, मालेगाव येथील ड्रग्जच्या कारखाना उद्ध्वस्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Bribery : लाचखोरांचाच फुलतोय मळा, सर्वसामान्यांचा आवळतोय गळा; संभाजीनगरमध्येही वाढली लाचखोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -