Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीतून कोणते तीन मुद्दे पुढे येतात?

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीतून कोणते तीन मुद्दे पुढे येतात?

भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांचे एकत्रितकरण

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालचे रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परंतु शरद पवार यांनी पक्षाची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर दिली नाही. प्रशांत किशोर यांनी तीन तासाच्या भेटीमध्ये केवळ देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव शरद पवार यांच्यासमोर मांडले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. देशात भाजपविरोधात तीसऱ्या आघाडीची स्थापना करण्याच्या दृष्टिने भेट झाली असल्याच्याही चर्चा सुरु आहे. तर पवार आणि किशोर यांच्या भेटीतून तीन मुद्दे पुढे येतात ते म्हणजे २०२४ लोकसभा निवडणूकीवर चर्चा, देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा आगामी लोकसभा निवडणकीत विरोधकांची मोट बांधण्यावर चर्चा तसेच उत्तरप्रदेशमधील परिवर्तनावर चर्चा अशा प्रमुख विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारसाहेबांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारसाहेबांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपुर्वी भाजपविरोधात राजकीय पक्षांची एक आघाडी तयार करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज असून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. राजनीतिकार प्रशांत किशोर यांना राष्ट्रीय राजकारणाची माहिती आणि आकडेवारीचा चांगला अभ्यास आहे. तीन तासांच्या बैठकीत याबाबत नक्कीच चर्चा करण्यात आली असणार.

भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांचे एकत्रितकरण

- Advertisement -

देशातील केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपविरोधात भक्कम आघाडी निर्माण करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महाआघाडी निर्माण करण्याची हालचाल सुरु आहे. या आघाडीबाबत चर्चा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात झाली असल्याची शक्यता आहे. किशोर हे लोकसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्याबरोबर भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी काम करतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. प्रशांत किशोर हे २०१४ रोजी लोकसभा निवडणूकीत भाजपसाठी रणनीति आखली होती परंतु नंतर किशोर यांनी भाजपमधून काढता पाय घेतला आणि २०१९च्या निवडणूकीमध्ये ममता बॅनर्जींना मदत केली आहे. विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांनाही प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला होता.

देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा

भाजपविरोधात तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आघाडीमध्ये देशाचे नेतृत्व कोण करणार याबाबतही प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे. देशपातळीवर काँग्रेससोबत गेल्यास किंवा काँग्रेसविरहित आघाडी केल्यास विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार याबाबत चर्चा झाल्याची शंका आहे. देशात सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा असणारा चेहरा पाहिजे. सध्या शरद पवार यांच्या नावाची विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून चर्चा सुरु आहे. परंतु महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी हे सक्षम असून तेच देशाचा विरोधी पक्षाचा चेहरा असल्याचे म्हटले आहे. यामुळे विरोधी पक्षाचा चेहरा कोण असू शकतो यावर चर्चा शरद पवार यांनी केली असल्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमधील परिवर्तनावर चर्चा

आगामी विधासनभा निवडणुकीनंतर उत्तर प्रेदशध्ये सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. भाजपमध्ये आता सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसचे उत्तर प्रदेशच्या मंत्रीमंडळातही बदल करायचे की नाही हा अधिकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे. प्रशांत किशोर यांनी पंजाब, बिहारमध्येही राजनीतीकार म्हणून काम पाहिलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन करण्याबाबत तेथील जनतेनं पक्क केलं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलं आहे.

- Advertisement -