घर उत्तर महाराष्ट्र तलाठी भरती परिक्षा गैरप्रकरणामध्ये संभाजीनगरची लिंक काय ?

तलाठी भरती परिक्षा गैरप्रकरणामध्ये संभाजीनगरची लिंक काय ?

Subscribe

नाशिक : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तलाठी परीक्षेतील गैरप्रकारानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाच्या खोलवर जाऊन नाशिक पोलीस तपास करणार का? असाच प्रश्न लाखो परीक्षार्थी उपस्थित करत असतानाच आता नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी एक स्वतंत्र पथकच तयार केले असून या पथकात सहायक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण 10 जणांचा समावेश आहे. नेमके या प्रकरणाची संभाजीनगरची लिंक काय याची खोलवर जाउन चौकशी करणार आहेत.

तलाठी भरती परीक्षेतील पेपर फुटल्याची घटना नाशिकमधील एका केंद्रावर गुरुवारी समोर आल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या गणेश रामसिंग गुसिंगे याला अटक करण्यात आली. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संबंध समोर आल्याने पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहे. पोलिसांनी अटकेतील गणेश गुसिंगे याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिकच्या म्हसरुळ पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करत चौकशी सुरु केली आहे. दिंडोरी रोडवरील तलाठी भरतीसाठी ऑनलाईन निश्चित वेब एजी इन्फोटेक या परीक्षा केंद्राच्या आवारात संशयित गुसिंगे याला वॉकीटॉकी, मोबाईल फोन घेऊन वावरताना ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी करत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल फोन, लॅपटॉप हेडफोन सीमकार्ड, वॉकी टॉकी अशा वस्तू आढळून आल्या. दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि सध्या नाशिकच्या म्हसरुळ पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपी गणेश गुसिंगेच्या छत्रपती संभाजीनगरमधील गावी जाऊन हे पथक तपास करण्याची शक्यता आहे. गणेश गुसिंगेचे अजून कोण कोण साथीदार आहेत? हे रॅकेटच कार्यरत आहे का? गैरप्रकार करणारे छत्रपती संभाजीनगरमधीलच असल्याचे का समोर येते? ही नक्की लिंक काय? आधुनिक साहित्य वापरत हायटेक कॉपीचे प्रशिक्षण दिले जाते का? यासह इतर गोष्टींचा पथकाकडून सखोल तपास केला जाणार आहे.

पोलीस भरतीतही गैरप्रकार

संशयित गणेश गुसिंगे हा वेब हॅकर असून आता तलाठी ऑनलाईन परीक्षेत त्याने त्याची चुलत बहिण संगीता गुसिंगे हिस ऑनलाईन पद्धतीने कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला. गुसिंगे हा तिलाच हायटेक पद्धतीने कॉपी पुरवठा करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील समोर आला होता. विशेष म्हणजे संशयित गुसिंगे यानेच पोलिस भरतीतही असा गैरप्रकार केल्याने त्याच्यावर पुणे जिल्ह्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत म्हसरुळ पोलीस ठाण्याचे एक पथक गुरुवारी (17 ऑगस्ट) रात्रीच वैजापूर येथील परसोडा गावी तपासासाठी रवाना झाले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -