घरट्रेंडिंगNIAकडून अटक करण्यात आलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा नक्की आहेत कोण?

NIAकडून अटक करण्यात आलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा नक्की आहेत कोण?

Subscribe

आतापर्यंत सचिन वाझे यांच्यासह NIA कडून ७ जणांना अटक

अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि मनसूख हिरेमन (mansukh Hiren) मृत्यूप्रकरणी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना NIAकडून अटक करण्यात आली आहे. (encounter specialist pradeep sharma arrested)  मनसुख हिरेन प्रकरणी NIAकडून तपास सुरु करण्यात आला.  प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील राहत्या घरावर NIA आज सकाळी ६ तास  झाडाझडती केली. आज लोणावळ्यातील एका रिसॉर्ट मध्ये एनआयएच्या एका टीमने प्रदीप शर्माला यांना ताब्यात घेउन त्यांना अटक करण्यात आली आहे.  अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणी दोन दिवसांपूर्वी संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक करण्यात आली होती. आतापर्यंत सचिन वाझे यांच्यासह NIA कडून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. आज अटक करण्यात आलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा नक्की कोण आहेत? जाणून घ्या.  (Who is Encounter Specialist Pradip Sharma arrested by NIA?)

कोण आहे प्रदीप शर्मा? 

  • प्रदीप शर्मा यांना  एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळले जाते.
  • १९८३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेत. त्यांनी केलेल्या कामगिरींमुळे त्यांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख मिळाली.
  • प्रदीप शर्मा यांनी आतापर्यंत ३१२ गुंडांचा एन्काऊंटर केला आहे.
  • अनेक कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आलेला आहे.
  • २००८ मध्ये पोलीस दलातून त्यांना  निलंबित करण्यात आले. त्यानंतर २०१७ साली त्यांना सगळ्या आरोपांमधून क्लिनचिट देण्यात आली होती.
  • क्निलचिट मिळाल्यानंतर  प्रदीप शर्मा यांनी २०१७मध्ये  दाऊदच्या भावाला देखील अटक केली होती.
  • २०१९ मध्ये प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देऊन नालासोपाऱ्यातून शिवसेनेच्या मतदार संघातून निवडणूकींच्या रिंगणात उभे राहून निवडणूका लढवल्या.

हेही वाचा – Antilia bomb scare case: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना NIAकडून अटक

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -