घरमहाराष्ट्रजयंत पाटलांच्या निलंबनामुळे विरोधक आज सभात्याग करणार? अजित पवार म्हणाले...

जयंत पाटलांच्या निलंबनामुळे विरोधक आज सभात्याग करणार? अजित पवार म्हणाले…

Subscribe

Ajit Pawar | ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाने काल सभात्याग केला. त्यानुसार, आजही विरोधक सभात्याग करतील का असा प्रश्न विचारला जात आहे.

नागपूर – राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्ष सभात्याग करणार असल्याचं बोललं जातंय. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत गटनेत्यांची १० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरेल असं ते म्हणाले.

दिशा सालिअन प्रकरणावर चर्चा सुरू असताना विधानसभेत काल गोंधळ झाला. गोंधळात सत्ताधारी पक्षातील आमदार व्हेलमध्ये जमा झाले. तेव्हा जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले असा आरोप करण्यात येतोय. निर्लज्ज शब्द असंसदीय शब्द असल्याने या शब्दावरून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाने काल सभात्याग केला. त्यानुसार, आजही विरोधक सभात्याग करतील का असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अधिवेशनाची ‘दिशा’ कोणती?

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी सकाळी १० वाजता राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत सभात्याग करायचा की सभागृहात जायचं याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

कर्नाटकच्या सरकारने सीमावादाबाबत ठराव समंत केला आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचे कर्नाटकच्या सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे, यावरूनही अजित पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही सीमावादवरून ठराव झाला नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कचखाऊ भूमिका घेत आहेत. सीमावादावरून मुख्यमंत्री ठामपणे भूमिका का मांडत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


कर्नाटक सरकार सीमावादावरून आक्रमकपणे भूमिका घेत आहेत. परंतु, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री तशी भूमिका घेत का नाहीत, हे कळलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – संजय राऊत देशद्रोही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप

सोयीचं राजकारण सुरू आहे

मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं छगन भुजबळ म्हणाले. यावरूनही गदारोळ झाला होता. यावरूनच अजित पवारांनी सोयीचं राजकारण सुरू असल्याची टीका केली. मला सभागृहात बोलायची संधी दिली तर मी सर्व दाखवणार आहे. याआधीही अनेकजणांनी मुंबईला असंच संबोधलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचाही समावेश असल्याचं ते म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -