घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्रपरीक्षा ऑनलाईन

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्रपरीक्षा ऑनलाईन

Subscribe

ओमायक्रॉनचा धोका : विद्यापीठाच्या 8 फेब्रुवारीपासून परीक्षा

नाशिक : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हिवाळी सत्रपरीक्षा फक्त ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२२  च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार्‍या ऑफलाईन परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या असून, ऑनलाईन परीक्षा या ८  फेब्रुवारी २०२२  पासून सुरु करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सहामाही अर्थात प्रमाणपत्र परीक्षा आणि ५६  सत्रनिहाय अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा दरवर्षी जानेवारीमध्ये होतात. चालू शैक्षणिक वर्षाची परीक्षा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. मात्र, सध्या ओमायक्रॉनचा धोका बळावत असल्याने ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच घेण्याचे आदेश विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांनी दिले आहेत. ८ फेब्रुवारी २०२२ पासून ऑनलाईन पध्दतीने परीक्षेस प्रारंभ होईल. शिक्षणक्रमनिहाय परीक्षेचे वेळापत्रक मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘एक्झामिनेशन’ या टॅब उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी पोर्टलवरील सूचना बघण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

- Advertisement -

परीक्षेचे स्वरुप

ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या परीक्षेत एकूण ५०  प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असून, एकूण प्रश्नांपैकी किमान ४०  प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे वर्गीकरण अंतिम परीक्षेच्या शीर्षाखाली ८०  गुणांमध्ये दर्शवले जाणार आहे.

परीक्षेवर वेब कॅमेर्‍याचे लक्ष

ऑनलाईन प्रॉक्टर्ड पध्दतीने होणार्‍या परीक्षेसाठी सॉफ्टवेअरद्वारे, वेब कॅमेर्‍याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. मर्यादेपेक्षा वॉर्निंग दिल्यास संबंधित विद्यार्थ्याची परीक्षा आपोआप बंद होईल. या विद्यार्थ्यास विद्यापीठात बोलवून समज दिली जाणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -