घरक्राइमपुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली, सतर्क नागरिकांमुळे तरुणी बचावली

पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली, सतर्क नागरिकांमुळे तरुणी बचावली

Subscribe

दर्शना पवार हत्याकांड प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात MPSC च्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील गजबजलेलं ठिकाण असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना आज (ता. 27 जून) सकाळी घडली.

पुणे : 18 जूनला पुण्यातील राजगडावर MPSC परीक्षेत तिसऱ्या क्रमांकाने पास झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे नामक आरोपीला अटक केली. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात MPSC च्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील गजबजलेलं ठिकाण असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना आज (ता. 27 जून) सकाळी घडली. सुदैवाने नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली असून सदर तरुणी थोडक्यात बचावली आहे. या प्रकरणातील आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (young man attacks a young woman with a knife due to one-sided love)

हेही वाचा – Darshana Pawar Murder Case : अशा पद्धतीने केली दर्शनाची हत्या; राहुलने कबुलीजबाबात दिली माहिती

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ या ठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने वार केले. सदर आरोपी हा मुलीचा मित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. हे दोघेही आधी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीला त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. पण तरुणीने या मुलाला नकार दिला. पण त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या आरोपी मुलाने मुलीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच तिला तिच्या कॉलेजच्या बाहेर गाठून हा मुलगा मारहाण करत असल्याचे तरुणीकडून सांगण्यात आले आहे.

या आरोपी तरुणाने मुलीला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर आज सकाळी ही मुलगी कॉलेजला मित्रासोबत जात असताना त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तरुणीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ज्यामध्ये आरोपी मुलीच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसत आहे. ही घटना घडत असताना काही नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. पण लेशपाल जवळगे या तरुणाने धाडस करत आरोपीला पकडले. त्यानंतर आणखी एका तरुणाने लेशपालला मदत करत आरोपीला पकडून त्याच्या हातातील कोयता काढून घेतला.

- Advertisement -

पुण्यात गेल्या काहि दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पण असे असले तरी या ठिकाणी विद्यार्थीनींवर प्रेमप्रकरणांमधून होणाऱ्या हल्ल्यांमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर MPSC चे शिक्षण घेणाऱ्या तरुणींसोबतच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हल्लेखोर मुलगा आपल्या मुलीला त्रास देत आहे. तिचा तो सतत पाठलाग करत होता, यासंदर्भातील माहिती आईला होती. तो तरुणीला वारंवार धमकीदेखील देत होता, याबाबतदेखील माहिती असल्याचं हल्ला झालेल्या तरुणीच्या आईनं सांगितलं. पुण्यासारख्या शहरात जर मुलींंवर दिवसाढवळ्या असं हल्ले होत असतील तर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातून बाहेर निघालेल्या मुली घरी येतपर्यंत मनाला घोर लागलेला असतो. त्यामुळे मुली कधी सुरक्षित असणार? असा प्रश्न तरुणीच्या आईकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -