घरक्रीडाODI World Cup 2023 Schedule : एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना...

ODI World Cup 2023 Schedule : एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना कधी पाहा

Subscribe

ODI World Cup 2023 Schedule : भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे (ODI World Cup 2023) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चक्क अंतराळातून प्रक्षेपण केले आहे. यानंतर आता आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक आज (27 जून) जाहीर केले आहे. भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा खेळवली जाणार असून पहिला सामना इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (Newzeland) यांच्यात होणार आहे, तर भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. परंतु या स्पर्धेतील महत्त्वाच्या म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

- Advertisement -

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे.भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेतील पहिला सामना 2019 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन संघात म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे. हे दोन्ही संघ 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत. त्याचबरोबर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही आणि 15 ऑक्टोबरला अहमदाबाद नरेंद्र मोदी मैदानावर भारत पाकिस्तान यांच्या महामुकाबला होणार आहे. या सामन्यावर जगातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा – ODI World Cup 2023 : विश्वचषक ट्रॉफीचे अंतराळातून प्रक्षेपण; BCCIकडून व्हिडीओ शेअर

- Advertisement -

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ आधीच पात्र ठरले असून उर्वरित दोन जागांसाठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळली जात आहे. या पात्रता फेरीतील सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत, यातील अव्वल दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत. पहिले दोन विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज संघ या विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे, तर श्रीलंका आणि झिम्बाब्वेला मुख्य फेरीत खेळण्याची सर्वाधिक संधी आहे. उर्वरित कोणते दोन संघ जगामध्ये सामील होणार याचा निर्णय 9 जुलै रोजी होणार आहे.

हेही वाचा – क्रिकेटर पृथ्वी शॉ निर्दोष? अभिनेत्रीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसांची माहिती

या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांसोबत राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. या स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरी मुंबईमध्ये 15 नोव्हेंबर तर दुसरी उपांत्य फेरी 16 नोव्हेंबरला होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबाद मैदानावर होणार आहे.

विश्वचषकातील भारताचे सामने :

8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर- 2, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर- 1, बेंगळुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -