सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

mira road family trying to suicide attempt in hotel dahisar seven year girl dead
ह्रदयद्रावक! बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाचा सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; चिमुकलीचा मृत्यू

खासगी सावकाराच्या जाचाला ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाच्या आई व भावाने संशयित खासगी सावकार निखील भावलेविरुद्ध तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. निलेश बाळासाहेब सोनवणे (रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, निलेशला पैशांची गरज असल्याने त्याने संशयित भावलेकडून १० हजार रुपये उसनेवार घेतले होते. भावले याने १० हजार रुपये वसुलीसाठी निलेशकडे तगादा लावला होता. त्यातून निलेश ताणतणावात असायचा. वसुलीसाठी भावलेने निलेशची दुचाकी ताब्यात घेतली होती. त्यातून त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी निलेश आईने पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असून, अद्यापपावेतो कोणालाही अटक केलेली नाही.