घरताज्या घडामोडीएक नवरा अन् दोन बायका, लग्न पडलं महागात; महिला आयोगाने बजावली नोटीस

एक नवरा अन् दोन बायका, लग्न पडलं महागात; महिला आयोगाने बजावली नोटीस

Subscribe

सोलापुरात एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले. दोन कुटुंबियांच्या सहमतीने आणि थाटामाटात या तिघांचा लग्न सोहळा पार पडला. पण लग्नानंतर आता नवदेवाला हे लग्न महाग पडले आहे. कारण तरुणाच्या लग्नाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

सोलापुरात एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले. दोन कुटुंबियांच्या सहमतीने आणि थाटामाटात या तिघांचा लग्न सोहळा पार पडला. पण लग्नानंतर आता नवदेवाला हे लग्न महाग पडले आहे. कारण तरुणाच्या लग्नाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. तसेच, पोलिसांना पत्र पाठवत आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. (Young man marries twin sisters Women Commission notice)

सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

- Advertisement -

माळेवाडी-अकलूज येथे एकाच वेळी दोन वधूंशी विवाह केल्याप्रकरणी वराविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी १९६०च्या कलम ४९४ नुसार द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नमके प्रकरण काय?

- Advertisement -

माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी अतुल आवताडे याने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून माळेवाडी-अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

अतुलशी लग्न केलेल्या रिंकी व पिंकी या आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करतात. वडिलांच्या पश्चात त्या आईसोबत राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी दोघी व आईदेखील आजारी पडली. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे त्यांना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली.


हेही वाचा –‘भारत जोडो यात्रे’नंतर काँग्रेसचे २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -