‘भारत जोडो यात्रे’नंतर काँग्रेसचे २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात 'भारत जोडो यात्रे'चे आजोजन करण्यात येत आहे. या 'भारत जोडो यात्रे'नंतर आता देशभरात काँग्रसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अर्थात ‘हाताला हात द्या’ अभियान सुरू करण्यात येणार आहे.

himachal pradesh election result 2022 congress win

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ‘भारत जोडो यात्रे’चे आजोजन करण्यात येत आहे. या ‘भारत जोडो यात्रे’नंतर आता देशभरात काँग्रसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अर्थात ‘हाताला हात द्या’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनापासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू होणार आहे. (After Bharat Jodo Yatra Congress Haath Se Haath Jodo campaign across the country from January 26)

भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर २६ जानेवारीपासून देशभरात कॉंग्रेस पक्षाकडून ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये गट, गण, पंचायत स्तरावर जनसंपर्क केला जाणार आहे. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेचे राहुल गांधींचे निवेदन असणारे पत्र जनतेला दिले जाणार आहे. या पत्रात यात्रेचा संदेश असणार आहे. शिवाय, मोदी सरकारविरोधातील आरोपपत्रही जोडलेले असणार आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे ‘महिला यात्रा’ही काढण्यात येणार आहे. या यात्रेचे नेतृत्व प्रियंका गांधी-वद्रा करणार आहेत.

काँग्रेसच्या सुकाणू समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे येत्या नवीन वर्षांत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे. पक्षाचे हे ८५ वे अधिवेशन असेल. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांच्या पक्षाच्या अध्यक्षपद निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणी स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. पक्षाध्यक्ष खरगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबतचा हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपाला विरोधकाच्या बाकावर बसवण्यासाठी कॉंग्रेस मैदानात उतरली आहे. अशातच आगामी काळात जनतेला कॉंग्रेसचे विचार पटवून देण्यासाठी आणि मतपरिवर्तन करण्यासाठी कॉग्रेसने बैठकींचे सत्र सुरू केले आहे. नुकताच झालेल्या काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.


हेही वाचा – कॉंग्रेसच्या बळकटीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी