घरमुंबईशहरात 'मराठी भाषा दिन' जल्लोषात साजरा

शहरात ‘मराठी भाषा दिन’ जल्लोषात साजरा

Subscribe

कल्याण-डोंबीवलीमध्ये दिंडीकाडून तसेच विद्यालयांमध्ये परिसंवाद घेऊन मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आज डोंबिवलीत मनसेच्या वतीनं ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत शेकडो शाळकरी मुलांसह डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. ज्ञानोबा माऊलींची मूर्ती आणि मराठी ग्रंथ पालखीत ठेवून त्याची शहरभर मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, वारकरी सहभागी झाले होते. सोबतच शाळकरी मुलांचाही मोठा सहभाग होता. तर डोंबिवलीकरांनीही नेहमीप्रमाणे पारंपरिक वेशभूषेत या ग्रंथदिंडीत सहभागी होत आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवले.

डोंबिवलीच्या फडके रोडपासून गावदेवी मंदिरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली, यानंतर पुस्तकांची दहीहंडी फोडली आणि ही पुस्तकं लहान मुलांना वाटण्यात आली. लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, आणि त्यांना मराठी भाषेचं महत्त्व कळावे, या उद्देशानं ही दिंडी काढण्यात आली आहे.

— राजेश कदम, मनसे शहराध्यक्ष

टॅबोलाईड आकाराच्या विशेषांकाचे प्रकाशन

मराठी भाषा दिन कल्याणच्या के.एम.अग्रवाल महाविद्यालयात मराठी वाड:मय मंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन आणि पत्रकारितेवर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विविध शाखेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा दिना’निमित्त टॅबोलाईड आकाराच्या विशेषांकाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आर.बी.सिंह, ट्रस्टी अनिल पंडीत, दिनेश सोमाणी, नितीन गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

पत्रकारितेच्या नव्या दिशा यावर परिसंवादा

मराठीतील नामांकित लेखकांच्या पुस्तकांवर आधारित लेखांचा या विशेषांकात समावेश आहे. त्यानंतर ‘पत्रकारितेच्या नव्या दिशा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सुचिता करमरकर (प्रिंट मिडीया), निनाद करमरकर (इलेक्ट्रॉनिक मिडीया) आणि केतन बेटावदकर (सोशल मिडीया) यांनी या विषयांवर संवाद साधला. अग्रवाल महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपप्राचार्य महेश भिवंडीकर, अनघा राणे मॅडम, पाटील मॅडम, कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. मीनल सोहोनी यांच्यासह अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Marathi bhasha din
अग्रवाल महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -