घरताज्या घडामोडीCorona Update: आज मुंबईत १,०१५ नवे कोरोना रुग्ण, ५८ जणांचा मृत्यू!

Corona Update: आज मुंबईत १,०१५ नवे कोरोना रुग्ण, ५८ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईत कोरोनाचे १ हजार १५ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजार ८७८ वर पोहोचला आहे. तर मुंबईत आज ५८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १ हजार ७५८ झाला आहे. तसेच आज ९०४ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत मुंबईत २२ हजार ९४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत २६ हजार १७८ कोरोनाचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

- Advertisement -

५८ मृत रुग्णांपैकी ४७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४० रुग्ण पुरुष आणि १८ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षाखाली होते. ३० जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर्वरित २६ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.


हेही वाचा – Corona Update: राज्यात मागील २४ तासांत १२० जणांचा मृत्यू तर २ हजार २५९ नवे…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -