घरमुंबईतानसा धरणाचे ११ दरवाजे उघडले

तानसा धरणाचे ११ दरवाजे उघडले

Subscribe

सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण हे दुपारी २.५० मिनिटांनी ओवरफ्लो झाले. धरण तुडुंब भरुन वाहू लागल्याने धरणाच्या ३८ दरवाज्यांपैकी ११ दरवाजे उघडण्यात आले आहे, अशी माहिती तानसा धरणाचे कार्यकारी अभियंता रमेश जोहर यांनी दिली तानसा धरणातून मुंबईकरता प्रतिदिन ४५५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो एकूण ३८ दरवाजे १३३ फूट उंची आणि २८३४.६४ मीटर लांबी असलेल्या तानसा धरणाची ४० हजार ६६० दशलक्ष गॅलन पाणी साठवण्याची क्षमता आहे. पाऊस जर धरण क्षेत्रात असाच पडत राहिला तर तानसाचे सर्वच ३८ दरवाजे उघडावे लागतील, असे कार्यकारी अभियंता रमेश जोहर यांनी सांगितले. तानसा पाठोपाठ मोडकसागर धरण ही लवकरच भरण्याची शक्यता असून शुक्रवारी मोडकसागर देखील तुडुंब भरुन वाहू शकतो, असा अंदाज तानसा जल विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -