घरमुंबई९८ हजार भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी १३ कोटींची उधळपट्टी

९८ हजार भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी १३ कोटींची उधळपट्टी

Subscribe

निर्बिजीकरण करणाऱ्या संस्थांना प्रत्येक कुत्र्यामागे ४०० रुपयांची वाढ

मुंबई महापालिका भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अशासकीय संस्थांमार्फत हजारो कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते. मात्र भटक्या कुत्र्यांची संख्या आणि या कुत्र्यांकडून लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना चावण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. आता भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी प्रति कुत्र्यासाठी अशासकीय संस्थांना देण्यात येणार आहेत . या दरात सरसकट ४०० रुपयांची वाढ करणार असून पुढील तीन वर्षात ९८ हजार १०० कुत्र्यांचे निर्बिजीकरणासाठी प्रति कुत्र्यामागे सरासरी १ हजार ३६५ रुपये याप्रमाणे ७ अशासकीय संस्थांवर तब्बल १३ कोटी ३९ लाख ४१ हजार ६०० रुपयांची रक्कम उधळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या ७ संस्थांनी पालिकेच्या मदतीने गेल्या २०१४ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत फक्त ९० हजार ७०३ कुत्र्यांचे निर्बिजीकरण शक्य झाले आहे. याबाबतचे गणित केल्यास या संस्थांनी दरवर्षी सरासरी फक्त १५ हजार ११७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचे समोर येते. तर दरमहा फक्त १ हजार २५९ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. तसेच, दर दिवसाचे गणित केल्यास ७ संस्था असूनही दिवसभरात १ -२ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात असल्याचे म्हणजेच कोट्यवधी रुपये खर्चूनही कासवगतीने निर्बीजीकरणाचे काम होत असल्याची सत्यता समोर येत आहे.

- Advertisement -

हिंदीत असे म्हटले जाते की, जब हाल यह है तो आलम क्या होगा. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणाऱ्या संस्थांचे कामाचा लेखाजोखा व आकडेवारी पाहिल्यास ६ वर्षात फक्त ९० हजार ७०३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याने एवढया मंदगतीने काम केले जात असेल तर आता पुढील तीन वर्षात ९८ हजार १०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे कसे काय शक्य होईल, असा सवाल सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे. जे काम करायला ६ वर्षे लागली तेच काम पुढील ३ वर्षात कसे काय होणार ?

संस्था व त्यांना देण्यात येणारी रक्कम

  •  द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज महालक्ष्मी – :१,१७,३०,००० रुपये
  •  द बॉम्बे सोसायटी फॉर प्रीव्हेंशन ऑफ क्रूएलटी टू ऍनिमल देवनार -: ६९,६०,०००रुपये
  •  इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स देवनार २,४१,५०,००० रुपये
  • अहिंसा मालाड -: १,३८,००,००० रुपये
  •  उत्कर्ष मित्र मंडळ, मुलुंड -: २,४३,६०,००० रुपये

युनिव्हर्सल ऍनिमल्स वेल्फेअर सोसायटी, मालाड -: ४,३५,००,००० रुपये तर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय , परळ -: ४२,९०,००० रुपये रक्कम देण्यात येणार आहे. या ७ संस्थाना मिळून १२ कोटी रुपये ८७ लाख ९० हजार रुपयांचे कंत्राटकाम अधिक ४% आकस्मित खर्च ५१,५१,६०० रुपये असे एकूण १३ कोटी ३९ लाख ४१ हजार ६०० रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोणाला किती मुलं होती मी सांगू का?; अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -