घरCORONA UPDATELockDown: ऊसतोड कामगार स्वगृही परतणार: एसटीचे १४० बसेस सज्ज

LockDown: ऊसतोड कामगार स्वगृही परतणार: एसटीचे १४० बसेस सज्ज

Subscribe

राज्यातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना मूळ गावी जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर बीड, हिंगोली आणि परभणीसाठी साधारणतः एसटी महामंडळाच्या १४० बसेस सज्ज झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मूळ गावी जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता बीड, हिंगोली आणि परभणीसाठी साधारणतः एसटी महामंडळाच्या १४० बसेस सज्ज झाल्या आहेत. या बसेस एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आणि सांगली विभागातून सोडण्यात येणार आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार या ऊसतोड मजूरांची वाहतूक करण्यात येणार आहेत.

देशभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले होते. अशातच राज्यभरात ऊसतोड कामगार लॉकडाऊन काळात घरापासून दूरवर अडकले होते. त्यात अवकाळी पाऊस आणि इतर समस्यांमुळे ऊसतोड कामगारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी केली होती. या मागणीला शासनाने मान्यता दिली असून आता त्यांच्या जाण्याची व्यवस्थी करण्यात येत आहे. अनेक साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी कामगार कार्यरत होते. मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांसाठी साखर कारखान्याच्या स्तरावर निवारागृह सुरु करण्यात आले. या निवारागृहात कामगारांची संख्या १ लाख ३१ हजार ५०० इतकी आहेत. त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी अनेक साखर कारखान्यांनी प्रासंगिक करारावर बसेस बुक करून त्या मराठवाड्याकडे सोडण्यात आलल्या आहेत. सोशल डिस्टसिंग पाळण्याकरता एका एसटी बसमध्ये फक्त २२ प्रवाशांची वाहतूक करण्यात येणार आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन काळात राज्यभरात ऊसतोड कामगार घरापासून दूर अडकले आहेत. त्यांना सुखरूप गावापर्यंत पोहोचवण्याकरता एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी आणि एसटीच्या विभाग नियंत्रक संपर्ककरून या बसेस सोडण्यात येत आहेत.
– राहुल तोरो, महाव्यस्थापक, वाहतूक

सुरक्षेची खबरदारी

ज्या जिल्ह्यात ऊसतोड कामगार अडकून पडलेले आहेत. त्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सुचनेनुसार साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि एसटी महामंडळाचे संबंधित विभाग नियंत्रक एकमेकांशी संपर्क साधून या बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांची वाहतूक करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकाराची खबरदारी घेण्यात येत आहे.

- Advertisement -

एसटी बसेस सोडण्याचे नियोजन सुरू

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, परभणी इथे ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ते सर्व ऊसतोड कामगार साखर कारखान्याचा परिसरात तात्पुरत्या निवारागृहात अडकून पडले आहेत. त्यामुळे बीड, हिंगोली आणि परभणीसाठी एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून ९३ तर सांगलीतून ३० अशा १२३ बसेस रवाना होत आहेत. आणखी काही बसेस सोडण्यात येणार आहे. त्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दैनिक आपलं महानगरला दिली.

हेही वाचा –

Coronavirus: विषाणू मानवाला उत्पन्न करता येत नाही; वुहान प्रयोगशाळेचे अमेरिकेला उत्तर

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -