Corona Update: मुंबईत २४ तासांत १,५११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ७५ जणांचा मृत्यू!

corona positive patient run away from covid quarantine center in dhule
धक्कादायक! धुळ्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमधून १५ रुग्णांनी केले पलायन!

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईत १ हजार ५११ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७८ हजार ७०८वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ६२९ झाला आहे. तसेच २४ तासांत ६२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४४ हजार ७९१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २९ हजार २८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

माहितीनुसार, मुंबईत आज १ हजार ३१ संशयित रुग्ण भर्ती झाले असून आतापर्यंत ५४ हजार ५८४ संशयित रुग्ण भर्ती झाले आहेत. आज झालेल्या कोरोनाबाधित मृतांमध्ये ६ मृत्यू गेल्या ४८ तासांत झाले होते आणि उर्वरित ६९ मृत्यू अगोदरचे होते. तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, ३८ जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर्वरित ३२ रुग्ण ४० ते ६० दरम्यान होते.

मुंबईतील रिकव्हरी रेट हा ५७ टक्के इतका आहे. ३० जूनपर्यंत ३ लाख ३३ हजार ७५२ कोरोनाच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. तसेच मुंबईतील दुप्पटीचा दर ४२ दिवस इतका आहे.


हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात ५५३७ कोरोना रुग्णांची नोंद!