घरCORONA UPDATECrime: सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

Crime: सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

Subscribe

सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपी चालकाला साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अपहरणासह बलात्कार आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी दुजोरा दिला आहे.

३२ वर्षांचा हा आरोपी हा साकिनाका येथील चांदीवली, संघर्षनगर परिसरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. डिसेंबर महिन्यांत त्याने एका सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले होते. आपण पिकनिकला जाऊ, असे सांगून तो तिला उत्तर प्रदेशातील गावी घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्याशी जबदस्तीने लग्न केले, त्यानंतर तिच्यावर काही दिवस लैगिंक अत्याचार केला होता. अनेकदा तो तिला मारहाणही करीत होता. एक महिन्यानंतर ते दोघेही मुंबईत आले. यावेळी त्याने पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांना हा प्रकार कोणालाही सांगू नका नाहीतर जिवे मारू, अशी धमकी दिली होती.

- Advertisement -

जिवाच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. या कालावधीत तो अनेकदा पीडित मुलीला मारहाण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होता. अलीकडेच तिच्या वडिलांनी ही माहिती त्याच्या एका मित्राला सांगितली. त्याने त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. या घटनेनंतर ते सर्वजण साकिनाका पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीसह तिच्या वडिलांच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -